*पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन*
Aj 24 Taas News Maharashtra
*अतुल वारे पाटील- करमाळा*
आपल्या कामाने तालुकवासीयांना आपलेसे करणारे करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी गर्दी केली होती.
*aj 24 Taas News Maharashtra channel च्या वतीने कर्तव्यदक्ष अधिकारी श्रीकांत पाडूळे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कोविड 19 च्या सावटामुळे वाढदिवसानिमित्त न भेटण्याचे आवाहन श्रीकांत पाडुळे यांनी केले होते मात्र त्यांनी कोविड काळात केलेले अभूतपूर्व काम, सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची त्यांची भूमिका आदींमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये ते प्रचंड लोकप्रिय आहेत आणि त्यामुळेच विविध सामाजिक संघटना, राजकिय पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते,तसेच सर्वसामान्य नागरिकांनी त्यांना सोशल डिस्टनसिंग चे पालन करून त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या व अभिष्टचिंतन केले. सोशल मीडियावर नागरिकांनी श्रीकांत पाडुळे यांच्या अभिष्टचिंतनाच्या पोस्ट शेअर करून त्यांच्याबद्दलचे प्रेम व्यक्त केले.बऱ्याच वर्षानंतर एक कर्तव्यदक्ष अधिकारी मिळाल्याची भावना सर्वांच्या मनात होती.आणि त्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांचे सहकार्य पोलीस प्रशासनाला मिळत आहे.
श्रीकांत पाडुळे यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्व नागरिकांचे आभार मानले असून भविष्यात सर्व तालुकवासीयांचे असेच प्रेम मिळेल असेच निष्पक्ष काम आपल्या हातून होईल असे अभिवचन त्यांनी दिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा