Breaking

रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात उद्या भाजपच्या वतीने इंदापूर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा


महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात उद्या भाजपच्या वतीने इंदापूर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा



इंदापूर:प्रतिनिधी शिवाजी पवार

    भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी सहकार व संसदीयमंत्री भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार व लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेचा जाहीर निषेध मोर्चा सोमवार दि. १२ अाक्टो. रोजी सकाळी १० वाजता पंचायत समिती ते तहसिल कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शरद जामदार आणि इंदापूर शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी दिली.

    कोविंड, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, स्त्रियांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना, अवैध बेकायदेशीर धंदे, इंदापूर तालुक्यातील रस्त्याची झालेली दुर्दशा, आरक्षण, मंदिरे तसेच इतर बाबतीत महाविकास आघाडी तसेच तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांना परिस्थिती हाताळण्यात अपयश आले असून सर्वसामान्य जनता ,शेतकरी, कामगार, मजूर यांच्या पुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या सरकारचा आणि इंदापूरच्या लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेचा जाहीर निषेध करण्यासाठी इंदापूर पंचायत समिती ते तहसील कार्यालय असे निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे. भाजप कार्यकर्त्याने या मोर्चात सामील व्हावे असे आवाहन तालुकाध्यक्ष शरद जामदार आणि शकील सय्यद यांनी केले आहे. 
_________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा