Breaking

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२०

पवार साहेबांच्या नावावर कोणीही आपले राजकीय हित साधण्याचा प्रयत्न करू नये- शिवराज जगताप*



पवार साहेबांच्या नावावर कोणीही आपले राजकीय हित साधण्याचा प्रयत्न करू नये- शिवराज जगताप*




*अतुल वारे पाटील- करमाळा*

    करमाळा तालुक्यात गाजत असलेल्या ऑडिओ क्लिप चा विपर्यास केला जात असून या क्लिप च्या आडून कोणीही आपले राजकीय हित साधण्याचा प्रयत्न करू नये असा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा शहराध्यक्ष शिवराज जगताप यांनी करमाळा येथे पत्रकार परिषदेत दिला आहे.
   यावेळी जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन चवरे,तालुका कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील,महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा विजयमाला चवरे,गौरव झांजुर्णे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते . यावेळी बोलताना शिवराज जगताप म्हणाले की,राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या बाबतीत कोणी खोटा कळवळा आणू नये आणि हा आणण्याचा नैतिक अधिकार कोणालाही नाही. नुकतीच करमाळा तालुक्यामध्ये एक ऑडीओ क्लीप व्हायरल झाली आहे. त्या मध्ये आप्पासाहेब झांजुर्णे यांनी शरद पवार किंवा रोहित पवार यांच्याबद्दल कोणतेही चुकीचे वक्तव्य केलेले नाही.  आप्पासाहेब झांजुर्णे हे पवार साहेब यांच्या जवळचे व विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्यामुळे चेअरमन पंधरा कोटी रुपये म्हणाले तेव्हा पंधरा कोटी काय अठरा कोटी मागतील  असे हे संभाषण आहे.  त्यामुळे चर्चेमध्ये नाव निघाले असेल परंतु त्याचा विपर्यास काढला जात आहे. पवार साहेबां बाबतीत फुकटचा पुतणा बाईचा पान्हा फुटू देऊ नये.  खोटा कळवळा आणू नये . पवार साहेबांच्या नावाचे फुकट भांडवल करू नये.  साहेबांच्या बाबतीत इतकेच प्रेम वाटते तर  पक्ष अडचणीत आसताना आपण कुठे होता? भाजप सरकारने पवार साहेबांना ईडीची नोटीस बजावली होती तेव्हा आम्ही करमाळा बंद केले होते, गोपीचंद पडळकर यांनी साहेबांच्या बाबतीत जे वक्तव्य केले होते त्या वेळी आम्ही जोडे गोपीचंद पडळकर यांच्या प्रतीमेस जोडे मारो आंदोलन केले. तेंव्हा आपण कोठे   गेला होता असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. चर्चा तालुक्यातील  स्थानिक राजकारणावर आहे त्यामुळे साहेबांचे नाव वापरून या मधून आपलं साधून घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये , अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा  शहराध्यक्ष शिवराज जगताप  यांनी यावेळी दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा