विठ्ठलगंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा सोमवारी भूमिपूजन समारंभ - धनराज शिंदे
आ.बबनदादा शिंदे व आ.संजयमामा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार
माढा / प्रतिनिधी -राजेंद्र गुंड
-माढा तालुक्यातील निमगाव (टें) येथील विठ्ठलगंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी व अद्ययावत फुड प्रोसेसिंग युनिट आणि सुसज्ज पॅकिंग हाऊसचा भूमिपूजन समारंभ सोमवारी 16 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 9.45 वाजता पुण्याचे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ.राजकुमार सोमकुंवर व सोलापूरच्या राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ.जोत्स्ना शर्मा यांच्या शुभहस्ते आणि आमदार बबनदादा शिंदे व आ.संजयमामा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती विठ्ठलगंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक तथा माढा वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष धनराज शिंदे यांनी दिली आहे.
माढा मतदारसंघातील शेतकऱ्यांचा कृषीमाल दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असूनही त्याला अपेक्षित दर मिळत नाही परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते त्यामुळे विक्रीच्या पारंपरिक साखळी पद्धतीत बदल करण्याच्या उद्देशाने आणि गोरगरीब व कष्टकरी शेतकऱ्यांचा कृषीमाल चांगल्या दराने खरेदी करून परदेशात निर्यात करण्याच्या हेतूने हे कृषिपूरक युनिट उभारण्यात येत आहे.याकरिता माढा तालुक्यातील व मतदारसंघातील गावोगावच्या बहुतांशी शेतकऱ्यांशी संवाद व चर्चा केली असून शेतकऱ्यांमधून मोठा उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने हे एकमेव अद्ययावत कृषीपूरक युनिट उभारण्यात येत आहे तसेच या कंपनीच्या माध्यमातून वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाणार आहे याचबरोबर सभासद शेतकऱ्यांच्या शेतातील माती व पाणी यांच्या तपासणी करिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रयोगशाळा तयार करण्यात येणार असून याचा निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष शिवाजी पवार,पलूसचे द्राक्ष तज्ञ मारुती चव्हाण यांच्यासह सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमासाठी गावोगावचे शेतकरी, कृषीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माढा वेलफेअर फाउंडेशनचे सचिव युवराज शिंदे यांनी केले आहे.
फोटो ओळी- 1) अध्यक्ष धनराज शिंदे
2) आमदार बबनदादा शिंदे
3) आमदार संजयमामा शिंदे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा