सोलापूर कडे जाणाऱ्या अंबुलन्स ने पाठीमागून ट्रकला धडक दिल्याने तीन जागीच ठार तर दहा जण गंभीर जखमी
मोहोळ प्रतिनिधी- aj24 news Maharashtra
मोहोळ आज पहाटे मोहोळ शहरानजीक सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर पुण्याहून सोलापूरच्या दिशेने मृतदेह घेऊन निघालेल्या ॲम्बुलन्सने धावत्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने अपघात होऊन. या मध्ये ॲम्बुलन्स मधील तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून अन्य १० जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी पहाटे ३.४५ वा. सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ शहरात नजीक घडला असून. अपघातातील जखमींना तातडीने सोलापूर येथील सर्व सिव्हिल रुग्णालयात उपचार हलविण्यात आले असून त्या ठिकाणी सध्या उपचार सुरू आहेत.
या बाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तेलंगणा येथील एक कुटुंब नातेवाईकाचा मृतदेह घेऊन अॅबुलन्सने (एम.एच. १२. आर.एन. ६३८७) तेलंगणाच्या दिशेने निघाले होते. शनिवारी पहाटे ३.४५ वाजता त्यांची अॅबुलन्स मोहोळ शहरातील कन्या प्रशाला चौक येथे आली असता, सोलापूरच्या दिशेने निघालेल्या धावत्या ट्रकला ( ट्रक क्र. एम.एच. ४३. बी.जी. ४५००) ॲम्बुलन्सची पाठीमागून जोरात धडक बसली. त्यामुळे भीषण अपघात होऊन ॲम्बुलन्स मधील १३ लोक गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्वप्रथम जखमींना शासकीय रुग्णवाहिकेतून उपचारासाठी तात्काळ सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात पाठवून दिले. त्यांपैकी तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताबाबत मोहोळ पोलिस स्टेशन स्टेशन वरील अपघाताची माहिती घेऊन खबर घ्यायचे काम चालू असल्याने जखमी आणि मृतांची नावे अद्यापही समजू शकली नाहीत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा