Breaking

सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२०

आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते कव्हेयेथे दिवाळी निमित्त बोनस वाटप.





आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते कव्हे
येथे दिवाळी निमित्त  बोनस वाटप.      


  कन्हेरगांव दि. प्रतिनिधी    धनंजय मोरे 

  श्री ज्योतिर्लिंग ग्रामसंघ,  कव्हे तालुका माढा यांच्या मार्फत दिवाळीच्या निमित्ताने सुमारे  एक लाख बत्तीस हजार रुपये  प्रोत्साहनात्मक बोनस वितरण  आमदार संजयमामा  शिंदे यांच्या हस्ते वाटप  करण्यात आले.  कार्यक्रमाचे    अध्यक्षस्थानी  सभापती विक्रमसिंह शिंदे होते
               . यावेळी पंचायत समितीचे सदस्य धनराज शिंदे, जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब उबाळे, पंचायत समिती सदस्य शहाजी शिंदे, हमाल पंचायत अध्यक्ष सुरेश बागल, माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत माळी, कव्हे चे सरपंच चंद्रकला कांबळे, उपसरपंच  औदुंबर ढेरे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दगडू चोपडे, सोसायटी चेअरमन अरूण माने, विनोद ढेरे, मनीषा ढेरे, मैना मांगणे, स्वाती निकम, सोनल चोपडे, मंदाकिनी माने, आफसाना सय्यद, रेणुका ढेरे, वैभव चोपडे, प्रवीण शिंदे,  व्यवस्थापक सलोमी जगले, बँक ऑफ इंडिया चे कैलास बागल, शिल्पा कन्हेरे, अवधूत देशमुख, बाबाराजे बागल  उपस्थित होते.
         प्रास्ताविक दगडू चोपडे यांनी केले. यावेळी सभापती विक्रमसिंह   शिंदे म्हणाले की, बचत गटाने केलेल्या वस्तूंची मार्केटिंग साठी विक्री केंद्र उपलब्ध करून देण्यात येईल तसेच महिला सक्षम करण्यासाठी  आम्ही कायम कटिबद्ध आहोत. यावेळी जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब उबाळे, शहाजी शिंदे, अवधूत देशमुख, श्रेया कारंडे, मंदाकिनी माने सोनल चोपडे, स्वाती निकम, यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन नामदेव काळे यांनी केले तर आभार विनोद ढेरे यांनी मानले.   
        कव्हे येथे एकूण  25  बचत गट  असून  290  सभासदांना आ. संजयमामा शिंदे यांच्या हस्ते बोनस वाटप करण्यात  आले. श्री महालक्ष्मी महिला स्वयं  सहाय्यता बचत गटाच्या वतीने प्रत्येक महिलेस  5  किलो तेल, 5 किलो साखर ,  एक हजार रूपये रोख दीपावली बोनस म्हणून देण्यात आले. श्री सिध्देश्वर महिला स्वयं सहाय्यता समुहाचे वतीने प्रत्येक सभासदांना  एक हजार रुपये रोख दिले. श्री भाग्यलक्ष्मी महिला गट  व  श्री महालक्ष्मी पुरूष बचत गटाच्या माध्यमातून  एक हजार रुपये रोख बोनस म्हणून वाटप करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा