Breaking

गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२०

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतक संघटनेने जातेगाव येथे रास्ता रोको आंदोलन*



*केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतक संघटनेने जातेगाव  येथे रास्ता रोको आंदोलन*

    *अतुल वारे पाटील - करमाळा*
केंद्र  सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ करमाळा तालुका स्वाभिमानी शेतकरी  संघटनेने जातेगाव ता करमाळा येथे रास्ता रोको आंदोलन केले.
   यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र गोडगे,जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब झोळ,करमाळा तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, युवा तालुकाध्यक्ष अमोल घुमरे,तालुका पक्षाध्यक्ष बापू फरतडे, तालुका उपाध्यक्ष तानाजी शिंदे,युवा ता उपाध्यक्ष बापू वाडेकर आदी पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष रविंद्र गोडगे म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदा करून कंपन्या मोठ्या होतील असेच धोरण अवलंबले आहे. शेत मालाच्या हमी भावापासुन केंद्र सरकार पळ काढत आहे व ह्या कायद्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. तसेच जिल्ह्यातील व तालुक्यातील कारखान्यांनी ऊसाचा दर जाहीर करूनच कारखाने चालू करावेत. तसेच लॉकडाऊन काळातील विज बिल माफ करावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
   पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांना विविध मागण्यांचे निवेदन उपस्थित आंदोलन कर्त्यांनी दिले. यावेळी दीपक शिंदे नानासाहेब वारे कांतीलाल शिंदे श्रीकांत शिंदे, भाऊसाहेब धुमाळ, भाऊसाहेब गाढवे, भाऊसाहेब शिंदे, कालिदास सुपेकर, बालाजी पाटील, हरी शिंदे, बाळासाहेब शिंदे, नासीर पठाण, राहुल वाघमोडे, राजू शिंदे, संभाजी शिंदे, राहुल शिंदे, प्रमोद वारे,तुषार शिंदे, विकास वारे, दिलीप काकडे आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा