Breaking

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

संस्कृती व वारसा जपण्यासाठी तालुक्यातील नवीपिढी सरसावली प्रविणभैया माने



संस्कृती व वारसा जपण्यासाठी तालुक्यातील नवीपिढी सरसावली प्रविणभैया माने


*AJ 24 Taas News Maharashtra*
इंदापूर प्रतिनिधी: शिवाजी पवार

इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील “किल्ला किंग” या संघाने आपली परंपरा,संस्कृती जपत साकारलेल्या शिवरायांच्या आरमाराचा किल्ला म्हणजे सुवर्णदुर्गाची प्रतिकृती आहे. असे मत पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रविणभैया माने यांनी व्यक्त केले.

दीपावलीच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथे पारंपारिक पद्धतीने किल्ला बनवण्यात आला आहे, या किल्ल्याची पाहणी आज प्रवीण माने यांनी केले यावेळी ते बोलत होते.

वालचंद नगर येथील किल्ल्याची बनावट पाहून “किल्ला किंग” या संघाला दहा हजार रुपयांचे बक्षीस यावेळी प्रवीण माने यांच्या वतीने देण्यात आले यावेळी बोलताना प्रवीण माने म्हणाले की आपली परंपरा संस्कृती वारसा जपण्यासाठी तालुक्यातील नवी पिढी समर्थ असल्याचे पाहून समाधान वाटले.

याप्रसंगी राजेश जामदार, बाळासाहेब गायकवाड, संतोष शिरसागर, नितिन बनसोडे, जितेंद्र दुरतकर, विजय कांबळे,अमरीश कंरडे, फारुक बागवान ,स्वप्नील कंदले,अतुल आंधळे, सिद्धांत लोंढे, अमोल चव्हाण आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा