Breaking

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०

ह भ प हरिश्चंद्र मारूती रोकडे ऊर्फ हरिनाना यांचे निधन **




ह भ प हरिश्चंद्र मारूती रोकडे ऊर्फ हरिनाना यांचे निधन 



करमाळा तालुका प्रतिनिधी - अतुल वारे पाटील

  आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व वांगी ग्रामपंचायतचे माजी सरपंच  हभप हरिश्चंद्र मारूती रोकडे ऊर्फ नाना (वय 70) रा.वांगी तालुका करमाळा यांचे अल्पशा आजाराने 18 नोव्हेंबर दुपारी एक वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले ,चार मुली , सुना नातवंडे, जावई असा परिवार आहे. स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय गुटाळ यांचे ते सासरे तर युवा नेते पै युवराज मामा रोकडे यांचे ते वडील होत.
स्व. हरिनाना रोकडे हे रामायण चे सुंदर वाचक होते.ते संपुर्ण पंचक्रोशीत 'हरिनाना' या नावाने परिचित होते. त्यांच्यावर वांगी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी सर्वस्तरातील नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा