चेअरमन अनिलकुमार अनभुले व डॉ.संतोष कदम यांचा विशेष सत्कार
विठ्ठलवाडी ग्रामस्थ व श्री स्वामी समर्थ पतसंस्थेच्या वतीने आयोजन
माढा / प्रतिनिधी - माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीचे येथील श्री स्वामी समर्थ पतसंस्थेचे संस्थापक-चेअरमन तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखाधिकारी अनिलकुमार अनभुले यांचा वाढदिवसानिमित्त व संतोष भिमराव पाटील महाविद्यालय मंदुप येथील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.संतोष कदम यांची नुकतीच सोलापूर विद्यापीठाच्या व्यावसायिक अर्थशास्त्र मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विठ्ठलवाडी ग्रामस्थ व श्री स्वामी समर्थ पतसंस्थेच्या वतीने वाचनालयाचे माजी अध्यक्ष तथा आदर्श शिक्षक पत्रकार राजेंद्र गुंड सर व सचिव सुशेन भांगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी श्री विठ्ठल सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक गोरखनाथ शेगर यांनी केले.
याप्रसंगी बोलताना आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड सर म्हणाले की, विठ्ठलवाडी येथील विठ्ठल सार्वजनिक वाचनालय, स्वामी समर्थ पतसंस्था व इतर संस्थांच्या उभारणीत चेअरमन अनिलकुमार अनभुले यांचा सिंहाचा वाटा आहे. सातत्याने प्रयत्न व त्यागाची भूमिका बजावत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.गावातील प्रत्येक संस्थेच्या माध्यमातून अनेकांना त्यांनी मदत केली असल्याचे सांगितले.
याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना डॉ.संतोष कदम म्हणाले की,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी भरपूर अभ्यास आणि जिद्द उराशी बाळगली पाहिजे. मनापासुन कष्ट केल्यास हमखास यश मिळते.मार्गदर्शक शिक्षक व मित्रमंडळींच्या सहकार्याने व प्रेरणेतून मी या पदापर्यंत पोहोचले याचा मला सार्थ अभिमान आहे.मी गावाचा नावलौकिक वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असून सध्याच्या पिढीतील युवकांनी निर्व्यसनी राहून प्रयत्नपूर्वक ध्येय साध्य करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन अनिलकुमार अनभुले,प्रभारी मुख्याध्यापक राजाभाऊ कदम, जोतीराम जाधव यांनी मनोगते व्यक्त केले.
याप्रसंगी प्रगतशील शेतकरी भिमराव शिंगाडे,हनुमंत पाटील,सौदागर गव्हाणे,शिवाजी कदम,महावीर बरकडे,सचिव सुशेन भांगे,सत्यवान गुंड,भिवाजी जाधव,अविनाश माने, समाधान कोकाटे,शिवाजी जाधव, सतीश शिंगाडे,भिमराव नागटिळक, सौदागर कोकाटे,युवराज शेगर,सुरज शेंडगे यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
सुत्रसंचालन करून आभार गोरखनाथ शेगर यांनी मानले.
फोटो ओळी - विठ्ठलवाडी ता.माढा येथे डॉ.संतोष कदम यांचा सत्कार करताना चेअरमन अनिलकुमार अनभुले, राजेंद्र गुंड, रामचंद्र भांगे व इतर मान्यवर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा