Breaking

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०

वालचंदनगर जवळ टमटमने मोटरसायकल चालकास धडक दिल्याने मृत्यू*



*वालचंदनगर जवळ टमटमने मोटरसायकल चालकास धडक दिल्याने मृत्यू*


*वालचंदनगर /प्रतिनिधी*

ऐन दिवाळीच्या तोंडावर  अपघात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
रणगावहून वालचंदनगर मार्गे जाणाऱ्या पांढव्या रंगाची  छोटा हत्ती टमटम याने  वालचंदनगर कंपनीतीलp कामगाराला धडक दिल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे वालचंदनगर  येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तो मृत्युमुखी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मौजे शिरसटवाडी येथे राहत असलेल्या व वालचंदनगर कंपनीतील   तुषार रामदास शिरसट ( वय ३२ वर्षे )  हा दुचाकीवरून (गाडी नंबर एम एच १४ ए पी ९७७३ ) कंपनीत सकाळची पहिली शिप सुटल्यानंतर वालचंदनगरहुन रणगाव मार्गे  ३ वाजून २० मिनिटांनंतर घरी जात असताना त्याला रणगावकडून वालचंदनगर कडे येणाऱ्या एका पांढरया रंगाची छोटा हत्ती टमटम याने 
समोरून जोरदार धडक दिल्याने त्याच्या डोक्याला,पायाला गंभीर मार लागल्यामुळे रक्तस्राव सुरू झाला.त्याला स्थानिक नागरिकांनी व कामगारांनी  कविशवर  हाॅसपिटल येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले मात्र जोरदार धडकेने तुषार शिरसट यांचा मृत्यू झाला. ऐन दिवाळीच्या तोंडावर टमटम याने  धडक दिली त्यात शिरसट याचा मृत्यू झाला.  गाडी भरधाव वेगाने निघून गेली.


:- वालचंदनगर  रणंगाव  जाणार्या  रोडने साळुंखे वसती  रस्त्यावर पांढरा छोटा हत्ती टमटम याने  जोरदार धडक दिल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा