बेंबळे। प्रतिनिधी।
बेंबळे येथील प्रतिष्ठित कुलकर्णी- बेंबळेकर घराण्याचे आधारस्तंभ व जनसामान्यांचे सहकारी,शांत, संयमी , प्रेमळ व अजातशत्रू व्यक्तिमत्व जगन्नाथ त्रिंबकराव कुलकर्णी यांचे शनिवारी( दिनांक 28) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले, ते 63 वर्षाचे होते .त्यांचे पश्चात आई, पत्नी ,बंधू ,मुलगा, सून, दोन विवाहित मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. जगन्नाथ कुलकर्णी हे 'जगूदादा' या नावाने सर्वपरिचित व्यक्ती होते. ते बेंबळे वि .का . सेवा सहकारी सोसायटीचे कांही वर्षे चेअरमन होते,तसेच बेंबळे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य असून ,माढा तालुका ब्राह्मण समाज कार्यकारिणीचे ते सल्लागार सदस्य होते .त्यांचे राजकीय ,सामाजिक,व वैयक्तिक पातळीवर सर्व थरातील नागरिकांशी अतिशय सलोख्याचे संबंध होते .त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ आणि दुःख व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच बेंबळे येथील बाजारपेठ आणि दुकाने बंद ठेवून त्यांना आदरांजली व्यक्त करण्यात आली. भाजपाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य रत्नाकर कुलकर्णी- बेंबळेकर यांचे ते बंधू होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा