******************************
रेडा (प्रतिनिधी) सध्या धावपळीच्या जीवनात जगत असताना प्रत्येक जण केमिकलयुक्त चहा पिऊन आपला आरोग्य धोक्यात घालत आहे. "आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो" हे लक्षात घेऊन सर्वांनी केमिकलयुक्त चहा सोडून गुळाच्या चहाकडे वळावे असे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथे भाग्यश्री गुळाचा चहा उद्घाटन प्रसंगी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रेस फोटोग्राफर शंकर मासाळ यांनी नव्याने चालू केलेल्या "#भाग्यश्री #गुळाचा #चहा " या हॉटेलचा प्रारंभ रविवार दि. २९ नोव्हेंबर रोजी इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन #राज्यमंत्री मा.ना. #दत्तात्रय ( मामा ) #भरणे व #सिनेअभिनेते #शिवकुमार #गुणवरे यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे #इंदापूर #तालुका #अध्यक्ष .#नीलकंठ #मोहिते यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य #प्रतापराव #पाटील,सागरबाबा मिसाळ,पत्रकार संघाचे जेष्ठ मार्गदर्शक मधुकर गलांडे,मुख्य सचिव सागर शिंदे, उपाध्यक्ष संदीप सुतार,जिल्हा संपर्क प्रमुख महेश स्वामी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ ढोले, तालुका संघटक भिमराव आरडे, उदयसिंह जाधव, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ ढोले, रामदास पवार, बाळासाहेब कवळे, गोकुळ टांकसाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा