*अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार प्रकरणी आहेरगाव येथील तरुणास बुधवार पर्यंत पोलिस कोठडी*
****************************
टेंभुर्णी (प्रतिनिधी) आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन एका तरुणाने शेजारील अल्पवयीन शाळकरी मुलीवर वारंवार लैगिक अत्याचार केल्याची खळबळजनक उघडकीस आली.गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी तरुणांच्या मुसक्या आवळल्या असून त्यास बार्शी न्यायालयाने बुधवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.ही घटना माढा तालुक्यातील वरवडे येथे शेतात घडली आहे.
याबाबत टेंभुर्णी पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की,वरवडे येथे शेतातील वस्तीवर एक १३ वर्षाची अल्पवयीन निर्भया आपल्या आई-वडीला,भावासह राहत होती.त्त्यांच्या घरासमोर योगेश पांडुरंग कदम (वय-२५) रा.आहेरगाव हाही राहत होता.तो येता-जाता सतत तिच्याकडे बघत होता.दोन महिन्यांपूर्वी एके दिवशी योगेश कदम याने त्या अल्पवयीन निर्भयास नाव काय आहे.कुठे शाळेत जाते असे विचारले होते.नंतर कदम याने स्वतःचा मोबाईल लिहून दिला व फोन करण्यास सांगितले.दुसऱ्या दिवशी त्या अल्पवयीन मुलीने कशासाठी फोन करण्यास सांगितले आहे हे जाणून घेण्यासाठी फोन केला असता कदम याने माझे तुझ्यावर प्रेम आहे असे सांगून घराजवळील शेतात भेटण्यास बोलावले.यामुळे ही मुलगी घरातील सर्वजण झोपले असता त्यास भेटण्यास शेतात गेली असता,योगेश कदम हा गोड बोलून अंगाशी झोंबाझोंबी करू लागला.यामुळे मुलीने घाबरून असे करू नका असे म्हणताच कदम याने त्याचे इच्छेप्रमाणे न केल्यास आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन बळजबरीने लैगिक अत्याचार केला.धमकी दिल्याने मुलीने घडला प्रकार कोणास ही सांगितला नाही.
यानंतर योगेश कदम याने वेळोवेळी रात्री बोलावून घेऊन आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असून ही अनेक वेळा जबरदस्तीने बलात्कार केला.दि.२९ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वा.मुलीस बोलावून घेऊन तिच्या इच्छेविरोधात जबरी बलात्कार केला व कुणास सांगितल्यास आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली.यानंतर मुलगी घरी येत असताना तिच्या भावाने तिला कदम याच्या बरोबर पाहिले.यानंतर घरी गेल्यावर आई-वडिलांना घडला प्रकार सांगितला.यावर सर्वांनी त्या मुलीस धीर देऊन काहीही झाले तरी त्या नराधमाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले.
यामुळे रात्रीच फिर्याद दाखल केली.गुन्हा दाखल होताच पोलिसांनी योगेश कदम यास अटक करून त्यास बार्शीतील विशेष न्यायालयात दाखल केले असता त्यास बुधवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला असून पोनि राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमित शितोळे हे अधिक तपास करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा