कोरोना पॉजीटिव्ह शिक्षकाने केले 10 दिवस अध्यापन,शाळाव्यवस्थापनाच्या सूचनांचे पालन न करणाऱ्या झरे हायस्कूलच्या मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी
करमाळा तालुका प्रतिनिधी
(अतुल वारे पाटील)
राज्य शासनाने शाळा सुरू करताना दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्याने कोरोना बाधित झालेल्या शिक्षकाने 8 ते 10 दिवस अध्यापन केले . यामुळे विद्यार्थ्यांवर कोरोनाची टांगती तलवार निर्माण झाली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या झरे हायस्कूल मुख्याध्यापकावर कडक कारवाईची मागणी संस्थेने केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की करमाळा तालुक्यातील झरे येथे ज्योतिर्लिंग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नामदेवराव जगताप माध्यमिक विद्यालय ही शाळा आहे. राज्य शासनाने दिनांक 23 नोव्हेंबर 2005 रोजी इयत्ता नववी व दहावी चे वर्ग सुरू करताना सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या RTPCR चाचणी करणे बंधनकारक केले होते. सदर शाळेतील नववी व दहावीच्या वर्गाला शिकवणारे 14 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत. याविषयी शाळा व्यवस्थापनाने RTPCR टेस्ट घेण्याच्या वारंवार सूचना मुख्याध्यापकांना दिल्या होत्या. मात्र शाळा सुरू होण्यापूर्वी एकही शिक्षकाने ही चाचणी केली नाही.शाळा सुरू झाल्यानंतर काही शिक्षकांनी रॅपिड अँटीजन टेस्ट केल्या. एका शिक्षकाने RTPCR टेस्ट केल्यानंतर तो शिक्षक कोरोना पोजीटिव्ह आला.तोपर्यंत 8 ते10 दिवस अध्यापन या शिक्षकाने केले होते. मुख्याध्यापकांनी व्यवस्थापनाच्या सूचनांकडे डोळेझाक करून शिक्षकांना वर्गावर RTPCR टेस्ट न घेता उपस्थित परवानगी दिली. यामुळे विद्यार्थ्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार निर्माण झाली आहे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्याध्यापकाच्या निष्काळजीपणामुळे शाळेतील विद्यार्थी व इतर कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे .तसेच येथील बरेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची RTPCR टेस्ट होणे बाकी आहे. त्यामुळे या शिक्षकाच्या संपर्कात आलेल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मुख्याध्यापकाची शिक्षण विभागाकडून चौकशी होऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी संस्थेने एका पत्रकाद्वारे केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा