*करमाळ्यात केळी संशोधन केंद्र उभा रहावे - गणेश चिवटे*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
करमाळा तालुक्यात केळी उत्पादन मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे केळी उद्योगाला चालना मिळण्यासाठी तालुक्यात केळीसंशोधन केंद्र उभा राहण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी माढा लोकसभा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे केली आहे. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख उपस्थित होते.
खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एक निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, तालुक्यात केळीचे क्षेत्र हे चार हजार हेक्टर
इतके आहे. त्यामुळे केळी व्हरायटीत वाढ होण्यासाठी ,नवीन रोग नियंत्रणासाठी औषध निर्माण होण्याचे संशोधन होणे गरजेचे आहे. त्याकरिता केळी संशोधनाची उपशाखा करमाळा तालुक्यात व्हावी, त्यामुळे तालुक्यातील केळी निर्यातीला मोठ्या प्रमाणात गती मिळेल आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या प्रगत होईल .केळी संशोधन केंद्राची आग्रही मागणी या निवेदनात गणेश चिवटे यांनी केली आहे
यावेळी गजानन भाकरे, अण्णा गायकवाड व कंदर येथील केळी प्रसिद्ध केळी प्रक्रिया उद्योजक व्यापारी किरण डोके आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा