*राज्यस्तरीय व्यसनमुक्ती कार्यशाळा व पुरस्कार वितरण सोहळ्याचे येरमाळा येथे आयोजन*
उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परिषदेच्या वतीने पहिली राज्यस्तरीय व्यसनमुक्ती कार्यशाळा व पुरस्कार वितरण सोहळ्याचे गुरुवार, दि.31 डिसेंबर रोजी येरमाळा (ता.कळंब) येथील येडाई व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्रात आयोजन करण्यात आले असल्याची माहिती व्यसनमुक्ती परिषदेचे अध्यक्ष डॉ.संदीप तांबारे यांनी दिली.
महाराष्ट्रातील व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणारी व्यसनमुक्ती केंद्रे, सामाजिक संस्था, व्यसनमुक्ती कार्यकर्ते या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. कार्यशाळेत व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत असलेल्या तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभणार आहे. याच कार्यक्रमात व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्ती व संस्थांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
येडाई व्यसनमुक्ती व पुनवर्सन केंद्र येरमाळा येथे होणार्या या कार्यशाळेची जय्यत तयारी करण्यात आली असून कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करुन ही कार्यशाळा घेण्यात येत असल्याचे व्यसनमुक्ती परिषदेचे अध्यक्ष डॉ.तांबारे यांनी सांगितले.
प
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा