*उंदरगाव मध्ये बिबट्याचे दर्शन ; बिबट्या जेरबंद करण्यासाठी वनविभागाची जोरदार फिल्डिंग*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
बुधवारी सकाळी उंदरगाव चे सरपंच हनुमंत नाळे यांना बिबट्याचे दर्शन झाले आणि परिसरामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. उंदरगाव परिसरामध्ये अत्यंत भीतीचे वातावरण असून बिबट्या जेरबंद करण्यासाठी वन विभागाने कंबर कसली आहे .हनुमान नाळे, मांजरगाव सरपंच महेश कुलकर्णी यांनी तात्काळ वन विभागाचे अधिकारी भाटे यांना दूरध्वनीवरून या प्रकाराची कल्पना दिली . वनविभागाने तात्काळ हालचाली करत येथे एक पिंजरा लावला असून दुपारनंतर श्वानपथक येणार आहे. येथील परिसरामध्ये बिबट्याचे सर्च ऑपरेशन चालू असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू आहे. *याबाबत बोलताना तालुका ग्रामसेवक संघाचे तालुका उपाध्यक्ष व मांजरगावचे सरपंच महेश कुलकर्णी म्हणाले की तालुक्यामध्ये शेतकरी वर्गात त्यामुळे प्रचंड घबराट पसरली असून शेतीची मशागतीची कामे ,पिकाला पाणी देणे तसेच दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे आणखी कोठे अनुचित प्रकार होण्याची वाट न पाहता वनविभागाच्या टीमने कसोशीने प्रयत्न करून या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी महेश कुलकर्णी यांनी केली*.यावेळी उदरगाव चे सरपंच हनुमंत नाळे मांजरगाव चे सरपंच महेश कुलकर्णी ,उंदरगावचे पोलिस पाटील विजय निकत मांजरगावचे पोलिस पाटील राजेद्र पाटील ,समाजीक कार्यकर्ते संतोष वाळुंजकर, स्थानिक शेतकरी दत्ता रंदवे, तानाजी खरात , समाधान काबळे तसेच वन विभागाची टीम व ग्रामस्थ
आदी शोध मोहीम राबवत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा