Breaking

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

आठ तोळे सोन्याचे गंठण चोरणारे आठ तासात जेरबंद



आठ तोळे सोन्याचे गंठण चोरणारे आठ तासात जेरबंद



भवानीनगर 25(सा.वा.) ; इंदापुर तालुक्यातील वालचंदनगर परिसरातील आनंदनगर येथील जेष्ट महिलेच्या गळ्यातील तीन लाख वीस हजार रूपयांचे आठ तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरणा-या दोन चोरट्यांना वालचंदनगर पोलीसांनी आठ तासामध्ये जेरबंद केले असुन शुभम आनंद किर्ते वय 24 रा.आनंदनगर व अजित बापु भोसले वय 24 वर्षे रा.आनंदनगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर वृत असे कि आनंदनगर येथील उज्वला उदय देशमुख या बुधवारी (दि.23) रोजी रात्री साडे नउ वाजण्याच्या सुमारास मंगल कार्यालयातुन लग्न समारंभच्या हळदीच्या कार्यक्रमारुन उरकुन घरी जात असताना पाठीमागुन दुचाकीरुन आलेल्या दोंघानी बळजबरीने हिसकावुन गळ्यातील तीन लाख 20 हजार रुपयांचे सोन्याचे गंठन हिसकावुन नेले या प्रकरणी उदय देशमुख वय 60 यांनी गुरुवारी (दि.24) रोजी वालचंदनगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली यांनतर वालचंदनगर पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली खबर्‍यामार्फत माहिती काढुन सहाय्यक पोलीस निरिक्षक दिलीप पवार, हवालदार मोहन ठोंबरे,पोलीस नाईक लक्ष्मण साळवे,जगन्नाथ कळसाईत यांच्या तपासाचे पथक तयार करून आठ तासामध्ये गुरूवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आनंदनगर मधील शुभम आनंद किर्ते व अजित बापु भोसले रा. आनंदनगर मधुन या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले दोंघाना पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली .त्यांच्याकडुन आठ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व दुचाकी असा तीन लाख सत्तर हजार रुपयांचा एवज जप्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा