Breaking

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा जन्मदिवस शेकडो गरिब महिलांना साड्या वाटून साजरा तुळजापूर रिपाई युवक आघाडीचा स्तुत्य उपक्रम*



*केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा जन्मदिवस शेकडो गरिब महिलांना साड्या वाटून साजरा तुळजापूर  रिपाई युवक आघाडीचा स्तुत्य उपक्रम*
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजीक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री संघर्षनायक डाॅ. रामदास आठवले यांच्या जन्मदिना निमित्त  तुळजापूर रिपाई युवक आघाडीचे तालुका सरचिटणीस शुभम कदम यांच्या संकल्पनेतून  शहरातील शेकडो  गरिब महिलांना साड्यांचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ, मराठवाडा उपाध्यक्ष आनंद पांडगळे, जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम, शहराध्यक्ष अरूण कदम, तालुका कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के, युवक आघाडीचे तालुका सरचिटणीस शुभम कदम यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
दि.२५)डिसेंबर रोजी सकाळी १२ वाजता तुळजापूर येथिल सुकेशनी बुद्ध विहार येथे
पारंभी तथागत गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदन घेऊन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. 
जन्मदिनाचे औचित्य साधून शहरातील प्रताप  लुगाजी कदम यांनी त्यांच्या समर्थकांसह रिपाई पक्षात जाहिर प्रवेश केला,
याप्रसंगी उस्मानाबाद तालुकाध्यक्ष भालचंद्र कटारे, जिल्हा सचिव,राजरत्न शिंगाडे, सचिन शिंगाडे जिल्हा संघटक सोमनाथ गायकवाड उस्मानाबाद शहराध्यक्ष उदायराज बनसोडे स्वराज जानराव,शरद सिरसाठे,मिलिंद सोनवणे, विद्यार्थी परिषदेचे राजपाल कदम, भाजपाचे  सागर कदम,मुन्ना कदम सिध्दार्थ ओव्हाळ,प्रेम कदम, यश भालेराव,आण्णा शहाजी कदम  आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते. 


प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा