Breaking

मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०

बाभुळगांवमध्ये शेतीच्या बांधावरून पती व पत्नीस बेदम मारहाण ! दोघांच्या विरोधात इंदापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.




बाभुळगांवमध्ये शेतीच्या बांधावरून पती व पत्नीस बेदम मारहाण ! दोघांच्या विरोधात इंदापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

 इंदापुर प्रतिनिधी :-शिवाजी पवार

शेतीच्या बांधावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका जोडप्याने दुसऱ्या जोडप्याला लोखंडी राँड व लोखंडी फवड्याच्या साह्याने जबर मारहाण केल्याची घटना  मंगळवार दि. ८ रोजी दुपारी दोनच्या सुमारास बाभुळगांव येथे घडली आहे. या प्रकरणी दोघांच्या विरोधात इंदापुर पोलीस ठाण्यात ३२६, ३२४, ५०४, ५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष बाबु भोसले व रेणुका संतोष भोसले रा. बाभुळगांव ता इंदापुर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची नांवे आहेत.

 तुषार प्रताप आसबे रा. बाभुळगांव ता. इंदापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. ८ डिसेंबर २०२० रोजी फिर्यादी व त्याची पत्नी ज्योती आसबे हे दोघेजण आपल्या शेतात काम करत होते अचानक दुपारी २ च्या सुमारास संतोष भोसले व रेणुका भोसले तिथे आले शेतीच्या बांधावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून संतोष भोसले यांनी शिवीगाळ करुन त्याच्या हातातील लोखंडी राॅडने फिर्यादीच्या पोटावर व मनगटावर मारुन हात फॅक्चर  करुन गंभीरपणे दुखापत केली अाहे. तर रेणुका भोसले हिने तिच्या हातातील लाकडी दांडक्याच्या साह्याने फिर्यादीच्या मांडीवर मारहाण करण्यात आली अाहे.

भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या पत्नीला संतोष भोसले यांने शिवीगाळ करून लोखंडी राॅडने मारहाण केली भांडणाचा आवाज ऐकून फिर्यादीचा आतेभाऊ सचिन बबन देवकर हे घटनास्थळी आले असता आरोपी संतोष भोसले व रेणुका भोसले हे घटनास्थळावरून निघून गेले नंतर सचिन देवकर यांनी फिर्यादी व त्याच्या पत्नीस उपचारासाठी इंदापुर उपजिल्हा शासकीय रूग्णालयात आणले प्राथमिक उपचारा नंतर फिर्यादीस खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास इंदापुर पोलीस स्टेशनचे मुंडे मॅडम करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा