Breaking

शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

करमाळा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात दुसरा बळी प्रशासन झाले हात बोल नागरिकांतून घबराटीचे वातावरण* अंजनडोह येथील महिलेचा दुर्दैवी मृत्यू* ; *करमाळा तालुक्यात दुसरी घटना हाहाकार*


 *करमाळा तालुक्यात हाहाकार*

*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
   लिंबेवाडीतील युवकाच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आज अंजनडोह ता करमाळा येथील जयश्री शिंदे या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला असून करमाळा तालुक्यात हाहाकार उडाला आहे. 

   याबाबत सविस्तर माहिती अशी की, 
यात हकीकत अशी कि, जयश्री शिंदे या दुपारी ३ वाजेपर्यंत त्यांच्या घरी होत्या. दुपारी ३ नंतर त्या अंजनडोह- पोंधवडी रस्त्यावर असलेल्या त्यांच्या शेतातील लिंबे तोडण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी २ गोण्या लिंबे तोडली होती. सायंकाळी साडे सहा नंतरही त्या घरी न आल्याने  परिवारातील सदस्यांनी त्यांचा शेतात शोध सुरु केला. तेव्हा त्यांना लिंबाच्या दोन गोण्या दिसल्या पुढे गेल्यानंतर त्यांच्या चपला व रक्त पडलेले आढळले, त्यानंतर पुढे शोध घेतला असता काही अंतरावर या महिलेचे केस व डोक्याचा भाग आढळला. धड मात्र  उशिरा धड सापडले
 हि सर्व परिस्थिती पाहून शिंदे परिवारात मोठा आक्रोश सुरु झाला. हि घटना ग्रामस्थांना समजल्यानंतर तातडीने पोलिसांना कळविण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, पोलीस नाईक अनिल निंबाळकर तसेच वन विभागाचे अधिकारी यांनी तातडीने घटना स्थळाला भेट देऊन शोध मोहीम सुरु केली. लिंबेवाडी येथील कल्याण देविदास फुंदे यांच्या दुर्दैवी निधनानंतर पुन्हा आजची दुसरी घटना घडल्याने तालुक्यातील नागरिकात बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.  
     तालुक्यातील आबालवृद्ध बिबट्याच्या भीतीने भयभीत झाले असून  वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अन्यथा नागरिकांना बिबट्याला गोळ्या घालण्याची परवानगी देण्याची संतप्त मागणी नागरिकांमधून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा