Breaking

रविवार, ६ डिसेंबर, २०२०

समृध्दी महामार्गासाठी गायरान जमिनीतून अवैधरित्या उत्खनन सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर**


*जालना प्रतिनिधी मनीषा मगरे*

जालना ( प्रतिनिधी ) : जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा महामार्ग म्हणून उदोउदो सुरू असलेल्या समृध्दी महामार्गाच्या कामासाठी मात्र जालना  शहराजवळील गौण खनिजावर संबंधित कंत्राटदाराकडून अवैधरित्या डल्ला मारला जात आहे. 
गुंडेवाडी शिवारातील गट क्रमांक 29 मधील शासकीय गायरान जमिनीतून बेकायदेशीरपणे मुरुमाचे उत्खनन करण्यात येत आहे. यासाठी महसूल अधिकारी - कर्मचाऱ्यांना हाताशी धरून संबंधित कंत्राटदार आणि शेख बशीर शेख बुढान यांना उत्खनन कारण्याची परवानगी देण्यात आली आहे. वास्तविक शासकीय गायरान जमिनीतून कोणत्याही प्रकारे उत्खनन करण्यात येऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असूनही त्या आदेशाची अवमानना महसूल विभागाने केल्याची तक्रार प्रशांत वाढेकर आणि गुंडेवाडी येथील नारायण गजर यांनी गुरुवारी ( दि.3) जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 
         समृध्दी महामार्गाचे काम करणाऱ्या गुजरात येथील  मॉंटोकॉर्लो लिमिटेड या कंत्राटदार कंपनीने सुरुवातीपासून अवैध उत्खनन केल्याचे नागरिकांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. यानंतर या कंत्राटदाराला अवैध उत्खनन प्रकरणी 250 कोटींचा दंड देखील ठोठावन्यात आलेला आहे. मात्र, तरी देखील  या कंत्राटदाराकडून अवैध उत्खनन करून गौण खनिजावर डल्ला मारल्या जात असल्याचे दिसत आहे. याबाबत गुंडेवाडी येथील नारायण गजर, प्रशांत वाढेकर यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे तक्रार दिली आहे. गुंडेवाडी येथील गट क्रमांक.29 मधील शासकीय गायरान जमीनीतून समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदार आणि शेख बशीर शेख बुढाण हे बेकायदेशीरपणे उत्खनन करीत आहे. गायरान जमिनीतून कोणतेही उत्खनन करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केलेली असताना महसूल विभागाच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी या कंत्राटदाराला उत्खनन करण्यास परवानगी दिली आहे. हा सर्वोच न्यायालयाचा अवमान असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. गुंडेवाडी शिवारातील कान्होबाचा डोंगर हा ऐतिहासिक वारसा असून हा डोंगर खोदण्याचे काम अवैधरित्या केले जात आहे. यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. यामध्ये दोषी असणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा