Breaking

शनिवार, १९ डिसेंबर, २०२०

चव्हाणवाडी टें गावची ग्रामपंचायत निवडणूक होणार बिनविरोध ?

चव्हाणवाडी टें गावची ग्रामपंचायत निवडणूक होणार बिनविरोध ?

*चेअरमन अशोक मिस्कीन तालुक्यात ठेवणार एक नवा आदर्श*


2005 नंतर चव्हाणवाडी ग्रामपंचायत बिनविरोध होण्याच्या मार्गावर?

संपूर्ण माढा तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या व जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीत किंगमेकर अशी ओळख असलेल्या टेंभुर्णी जिल्हा परिषद गटातील चव्हाणवाडी टें गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
कोरोना रोगाचा प्रादुर्भाव, निवडणुकीत होणारा बेमाफ खर्च, निवडणुकीवरून गावात होणारे वादविवाद टाळण्यासाठी व सर्वांनी मिळून गावचा विकास करण्याकरिता या वर्षीची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करावी असा प्रस्ताव चव्हाणवाडी वि. का. सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन राहुल चव्हाण यांनी मांडला आहे.
या प्रस्तावास गावातील राजकीय प्रमुख दोन पार्टी पैकी एक असलेली कै.रघुनाथ आबा चव्हाण या पार्टीतील प्रमुख नेतेमंडळींनी एक पाऊल पुढे येत सहमती दर्शवली आहे.
यापैकी दुसऱ्या व सत्ताधारी पार्टीचे प्रमुख अशोक मिस्कीन यांनी मात्र मांडण्यात आलेल्या प्रस्तावावरचा निर्णय अध्याप घेतला नसल्याचे सांगण्यात आले आहे.
2005 ला दोन्ही पार्टीच्या चर्चेअंती चव्हाणवाडी टें ग्रामपंचायत बिनविरोध झाली असल्याने याहीवर्षीची जाहीर झालेली ग्रामपंचायत बिनविरोध होऊ शकते अशी चर्चा गावामध्ये सुरू आहे.
एक मनमिळाऊ, शांत स्वभावाचे व उमदे नेतृत्व म्हणून तसेच माढा तालुक्याचे आमदार बबनरावजी शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून ज्यांना ओळखले जाते असे पार्टी प्रमुख अशोक मिस्कीन हे गावच्या विकासाकरिता असलेला ग्रामपंचायत बिनविरोधचा प्रस्ताव मान्य करून एक नवा आदर्श तालुक्यात ठेवतील अशी आशा गावकऱ्यांना वाटत आहे.
त्यामुळे अशोक मिस्कीन काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून राहिले आहे.
*********************************************
चव्हाणवाडी ग्रामपंचायत हि सात सदस्यांची बॉडी असून या ग्रामपंचायतीवर सलग ३५ वर्षे सोसायटीचे बिनविरोध चेअरमन असलेले कै. रघुनाथ (आबा) चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आलेली पार्टी आजही सक्रिय असून आजही होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पूर्ण तयारीने ताकतीने उतरण्याच्या मार्गावर आहे. 

दुसरा गट म्हणजेच राजकीय वर्तुळामध्ये प्रत्येक जि.प व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये चव्हाणवाडीचे मतदान हे अतिमहत्वाचे ठरत आहे. त्या मतांवर एक वेळेस मा.जि.प.सदस्य संजय पाटील भिमानगरकर निवडून आले होते. तर टेंभुर्णी पंचायत समिती गटामध्ये माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजीत भैय्या शिंदे हे चव्हाणवाडी गावच्या मतावरच पंचायत समिती सदस्य झाले होते. त्याचा बहुमान चव्हाणवाडीचे चेअरमन अशोक मिस्कीन यांनाच मिळतो.
 चेअरमन अशोक मिस्कीन हे या ग्रामपंचायतला नक्कीच बिनविरोध करण्याचा बहुमान मिळतील असे सर्वसामान्य जनतेतुन बोलले जात आहे.
 चव्हाणवाडी ग्रामपंचायतीमध्ये सात सदस्यांची बॉडी असून त्या बॉडी मध्ये जी पार्टी चार सदस्य घेतील त्यांनी शेवटची अडीच वर्षे सरपंच पदाचा बहुमान घ्यावा तर ज्या पार्टीचे तीन सदस्य असतील त्यांनी पहिली अडीच वर्षे सरपंचपद घ्यावे अश्या पद्धतीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
 चव्हाणवाडी ग्रामपंचायत चेअरमन अशोक मिस्कीन, तंटामुक्त अध्यक्ष अरुणबापू चव्हाण, नागनाथआप्पा चव्हाण, विकास सोसायटीचे चेअरमन सुभाष इंदलकर -पाटील व माजी उपसरपंच हनुमंत चव्हाण, भागवत खडके, अर्जुन सलगर,सरपंच प्रतिनिधी संतोष जाधव, माजी चेअरमन नरहरी नांगरे, तसेच महावीर नांगरे , माजी सरपंच अनिल दादा नागरे व नवनाथ शिंदे, नवनाथ नांगरे सर,   
यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध होण्याच्या मार्गावर असून अशोक मिस्किन काय निर्णय घेतात याकडे सर्व चव्हाणवाडीकरांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा