टेंभुर्णी येथे महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी व युवा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने टेंभुर्णी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्रकुमार केंद्रे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी शिवसेना नेते संजय कोकाटे,टेंभुर्णी प्रेस क्लबचे अध्यक्ष सोपान ढगे,उपाध्यक्ष गणेश चौगुले,ज्येष्ठ पत्रकार डी एस गायकवाड सर,विष्णू बिचुकले,सतीश चांदगुडे,रघुनाथ बनसोडे,सचिन होदाडे,अनिल जगताप,तसेच टेंभुर्णी चे सरपंच
मा. प्रमोद कुटे, ग्रामपंचायत सदस्य गणेश बापू केचे, शैलेश ओहोळ,आयु. सूर्यकांत खरात व इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौसष्ठ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी व युवा आघाडी तसेच मेडिकोअर ब्लड बँक, यांचे वतीने टेंभुर्णी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सध्याचे कोरोना रोगाचे सावट व त्यातून रुग्णांसाठी आवश्यक रक्तपुरवठा व सामाजिक बांधिलकी या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी यावेळी परिसरातील नागरिकांसह मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला.सुरक्षित अंतर मास्क व सॅनिटायझर यांचा वापर करून.रक्तदात्यांसाठीअल्पोपाहाराचेही नियोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. यावेळी १०४ रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवून या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित उपक्रमात सहभाग नोंदवला.
सदर रक्तदान शिबिर पार पाडण्यासाठी विशाल नवगिरे (जिल्हा महासचिव वंचित),मार्गदर्शक राहुल चव्हाण सर,प्रा. युवराज वजाळे सर,प्रविण आण्णा वाघमारे ता.अध्यक्ष,विशाल दादा मिसाळ शहराध्यक्ष टेंभुर्णी,अँड जुगल खरात,तुषार खरात,राजू वाघमारे, विक्रम खरात, किरण कांबळे, अविनाश लोंढे, रामभाऊ नवगिरे, रणजित गायकवाड,गणेश खरात,तात्या सरवदे, सागर सरोदे भिमानगर, प्रविण बनसोडे शिराळ अद्यक्ष,सुमित खरात,सागर खरात, दादा खरात,अक्षय सोरटे,प्रवीण लांडगे,शुभम सिरसट,सुमित गायकवाड,अविनाश कांबळे,विशाल घाडगे,सुमित लक्ष्मण खरात व इतर अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा