Breaking

शनिवार, २६ डिसेंबर, २०२०

*उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद यांना व्यापार्‍यांचे निवेदन*



*उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद यांना व्यापार्‍यांचे निवेदन* 


सदरील निवेदना मध्ये सद्य परस्थितीला तुळजापूर शहरा मध्ये एकेरी वाहतुक केलेली आहे त्या एकेरी वाहतुकीस तुळजापूरच्या व्यापारी वर्गाचा विरोध आहे या पूर्वीही उपविभागीय पोलीस उपअधिक्षक तुळजापूर यांना व्यापार्‍यांच्या वतीने निवेदन देण्यत आले होते. वरील निवेदना मध्ये समस्त तुळजापूर वासियांनी,व्यापारी यांना नाहक त्रास होत आहे. सद्य परस्थिती मधील एकेरी वाहतुक मार्ग हा बंद करावा अशी मागणी धरली आहे सद्य परस्थितीला जुने बस स्थानक चौका मध्ये एकेरी वाहतुक करुन एकंदरीत बस स्टँड जवळ वाहतुकीची कोंडी होत आहे आज दि 26-12-2020 रोजी सकाळी एकेरी वाहतुक जुने बस स्थानक जवळ असल्याने ट्रक व शहरात जात असलेल्या मोटार सायलचा गंभीर धडक होऊन मोटार सायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे परंतु पोलीस हे सबंध शहरात मध्ये दंड पावती (आँनलाईन)फाडण्यात आपली धन्यता मानत आहेत तरी वरील एकेरी वाहतुक बंद करुन सर्व मार्ग सुरळीत नाही केल्यास आंदोलन पुढील आंदोलन पुकारण्यात येणार आहे असे सबंध व्यापारी वर्गाने सांगितले आहे.

AJ24Taas News

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा