सुरवड ग्रामपंचायतीच्या नूतन उपसरपंच प्रियांका म्होपरकर यांच्या सत्कार प्रसंगी हर्षवर्धन पाटील व अंकिता पाटील.
*******************************************
सुरवड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रियांका म्होपरकर
इंदापूर प्रतिनिधी:-शिवाजी पवार
सुरवड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रियांका राहुल म्होपरकर यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा माजीमंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो येथे आज शनिवार दि. १२ रोजी सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनीही नूतन उपसरपंच प्रियांका म्होपरकर यांना शुभेच्छा दिल्या.
हर्षवर्धन पाटील यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, लोकहितासाठी विविध योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करा. कुठलेही काम करीत असताना सकारात्मक विचार ठेवल्यास कोणतेही काम चांगले होते.
याप्रसंगी सुरेश मेहेर, दादासाहेब घोगरे, बाळासाहेब घोगरे, रामदास कोरटकर, ब्रह्मदेव कोरटकर व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
_______________________________
सुरवड ग्रामपंचायतीच्या नूतन उपसरपंच प्रियांका म्होपरकर यांच्या सत्कार प्रसंगी हर्षवर्धन पाटील व अंकिता पाटील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा