*रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम : मधुशाली महाविद्यालयास देण्यात आली पुस्तके भेट*
सलगरा दिवटी, प्रतिनिधी - प्रतिक भोसले
सामाजिक क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या त्याचबरोबर आताच्या पिढीमध्ये शिव-विचारांची तेजस्वी ज्योत अखंड तेवत ठेवण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असणाऱ्या रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान उस्मानाबाद, यांच्या वतीने रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेचे, इतिहासाचे युवा अभ्यासक प्रमुख प्रवक्ते प्रमोद कारकर यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटी येथील मधूशाली कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील पुस्तकालयास उस्मानाबाद जिल्हयातील सदस्यांच्या वतीने पुस्तके भेट देण्यात आली.
पुस्तके वाटप करण्याच्या या स्तुत्य उपक्रमाचे महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आभार व्यक्त करत कौतुक केले.
या वेळी प्राचार्य - एन.एन.स्वामी, एम ए.मुबिन, एस.जी.केसकर, के.ए. सुरवसे, एस.आर.गिरी, एस.व्ही.भोसले, एस.डी.पारवे आदी शिक्षक वर्ग त्याचबरोबर प्रतिष्ठानचे उस्मानाबाद जिल्हा सदस्य प्रसाद राजमाने, राम जळकोटे, विशाल केदार, मनोज देवकते, प्रतिक भोसले, वैभव मुळे, अविष्कार फस्के, ॲड.काणिफ काणतोडे, शुभम नलावडे, गणेश काटे, किरण मोजगे, आकाश घालके आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा