*राष्ट्रवादी महिला आघाडीकडून कर्तबगार महिला सरपंचांचा गौरव*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक तसेच देशाचे माजी कृषिमंत्री खा शरदराव पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त दुरंदे गुरुकुल , कोर्टि येथे राजकिय तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला सरपंचांचा गौरव करण्यात आला.
यावेळी सरपंच, गुणवंत शिक्षिका, कोव्हिड काळात उत्कृष्ट काम केलेल्या परिचारिका,अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचा गुणगौरव करण्यात आल.
यावेळी महिला सरपंच गायत्री महेशकुमार कुलकर्णी( मांजरगाव),लता मारकड(उमरड), सविता भगवान तनपुरे (वरकटने), मनीषा बाळासाहेब कावळे (रामवाडी) तसेच शिक्षिका ज्योती बोटकर, ज्योती शिंदे, गोसावी मॅडम, टेकाळे सिस्टर, अंगणवाडी सेविका अंजना मेढे, आशा वर्कर हसीना शेख यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिलादेवी झांजुर्णे होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्षा तृप्ती साखरे , ऍड सविता शिंदे, जिल्हा उपाध्यक्षा विजयमाला चवरे, शहराध्यक्ष राजश्री कांबळे, युवा नेते श्रीकांत साखर, गौरव झाजुर्णे, अशपाक जमादार, बाळासाहेब कावळे, महेशकुमार कुलकर्णी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा नलिनी जाधव यांनी केले .सरपंच मनीषा कावळे यांनी मनोगत व्यक्त केले. महिलांविषयी असे कार्यक्रम ग्रामीण भागात राबवण्याची गरज आहे. साहेबांच्या वाढदिवसानिम्मित आमचा महिला सरपंचांचा सन्मान केला हे आमच्यासाठी खूप भूषणावह आहे. यावेळी बोलताना तृप्ती साखरे यांनी महिलांना मिळालेले स्थानिक स्वराज्य संस्था यातील ५०टक्के आरक्षण, सैनिक दलात महिलांना प्रवेश, शक्ती कायदा आदी योजना ज्या शरद पवार यांच्या पुढाकाराने साकारल्या त्यांचा गौरव केला. सूत्रसंचालन सचिन नवले यांनी केले. आभार विजयमाला चवरे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा