Breaking

गुरुवार, १७ डिसेंबर, २०२०

बिबट्याचा करमाळा तालुक्यातून माढा तालुक्यात प्रवेश..... वनखात्याच्या अधिकाऱ्यांचा अंदाज......... टेंभुर्णी-बेंबळे-कोंढारभाग परिसरातील नागरिकांनी सावध रहावे...... तहसीलदार राजेश चव्हाण

बिबट्याचा करमाळा तालुक्यातून माढा तालुक्यात प्रवेश..... वनखात्याच्या अधिकाऱ्यांचा अंदाज.........
  टेंभुर्णी-बेंबळे-कोंढारभाग परिसरातील नागरिकांनी सावध रहावे...... तहसीलदार राजेश चव्हाण

 बेंबळे ।प्रतिनिधी।        बिबट्याचा संग्रहित फोटो   

             करमाळा तालुक्याची हद्द ओलांडून हिंस्त्र प्राणी बिबट्याचा कदाचित माढा तालुक्यातील अकोले खुर्द, कन्हेरगाव, टेंभुर्णी परिसर, बेंबळे परिसर ,परिते ,अकोले बुद्रुक ,वेणेगाव किंवा कोंढार भागातील रांजणी ,आलेगाव परिसरात प्रवेश झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे वन विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी कळवले असल्यामुळे सर्व नागरिकांनी सतर्क- सावध राहावे असा इशारा माढा तहसीलदार राजेश चव्हाण यांनी दिला आहे.
                     वृत्तांत असा की तीन महिन्यापूर्वी जुलै-ऑगस्टमध्ये बेंबळे, परिते ,अकोले बुद्रुक या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. अनेक शेतकर्यानी त्याला उसाच्या फडातून बाहेर जाताना पाहिले होते तसेच रात्रीच्या वेळी भुंकणाऱ्या कुत्र्यांचा काही ठिकाणी या बिबट्याने फडशा पाडला होता व अचानक त्याने पंढरपूर तालुक्यातील भीमा नदी काठाकडे मोर्चा वळवला होता.  
      सध्या मागील पंधरा ते वीस दिवसापासून एका नरमांसभक्षक बिबट्याने करमाळा तालुक्यातील पूर्व पश्चिम भागात धुमाकूळ घातला आहे. त्याला पकडण्यासाठी वनरक्षक अधिकारी, पोलीस यंत्रणा, ड्रोन कँमेरे, हेलिकाँप्टर आधी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत परंतु त्यांने सर्वांना आतापर्यंत हुलकावणी दिलेली असून कदाचित त्याने माढा तालुक्याच्या बेंबळे, टेंभुर्णी परिसर किंवा कोंढार भागात प्रवेश केला असण्याची शक्यता वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत माढा महसूल विभागाला कळवण्यात आलीआहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी स्वतःच्या व पशुधनाच्या बाबतीत सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे टेंभूर्णी, बेंबळे ,कोंढार भाग हा परिसर केळी, द्राक्षे ,ऊस ,डाळिंब आदी पिकांचे आगर आहे. बिबट्यासारखा हिंस्र प्राणी दिवसभर कुठेही दडून बसू शकतो व सायंकाळच्या दरम्यान बाहेर पडून शिकार करू शकतो.   हा बीबट्या                    नरमौंसभक्षक असल्यामुळे करमाळा तालुक्‍यातील तीन माणसांसहीत गाय,वासरू,रेडकू  यांचाही त्याने फडशा  पाडलेला आहे. त्याला पकडण्यासाठी पालक मंत्री, खासदार, आमदार पासून वन खाते , महसूल खाते व पोलीस खात्याने जोमाने प्रयत्न केले  असूनदेखील तो निसटून गेलेला आहे, त्यामुळे वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार माढा तहसीलदारांनी या भागातील नागरिकांना सावधानतेचा व सतर्कतेचा इशारा दिला आहे.
  चौकट....        विशेष म्हणजे या संपूर्ण  परिसरामध्ये सध्या ऊस तोडणी मोठ्या प्रमाणावर चालू आहे .त्यामुळे रात्री अपरात्री देखील उसाचे ट्रक्टर  भरून द्यावे लागतात. तसेच   दुपारी 4 ते 12 व रात्री बारा ते सकाळी आठ पर्यंत ज्या ठिकाणी विद्युत पुरवठा असेल येथील शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते.
       तसेच सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे सर्वत्र  पडघम वाजू लागले आहेत .त्यामुळे सर्वच गावचे पार्टी प्रमुख व त्यांचे कार्यकर्ते रात्रभर मतदारांची जुळणी करण्यासाठी व गाठीभेटी घेण्यासाठी वाड्यावस्त्यावरून फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे अशा सर्व विभागात वावरणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे असा सावधानतेचा इशारा माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी दिला आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा