Breaking

रविवार, २० डिसेंबर, २०२०

जाणीव पुर्वक मला टार्गेट केल जात आहे ,माझ्या वर केल्याल्या आरोपात काही तथ्य नाही. ..पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर.


जाणीव पुर्वक मला टार्गेट केल जात आहे ,माझ्या वर केल्याल्या आरोपात काही तथ्य नाही.
 ..पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर
इंदापुर प्रतिनिधी :शिवाजी पवार

कांदलगाव ता इंदापुर जि पुणे येथील बाबर ऊस प्रकरण चांगलेच रंगले असून याप्रकरणात भारत मुक्ती मोर्च्याचे राष्ट्रीय महासचिव अँड राहुल मखरे व पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुका अध्यक्ष संजय सोनवणे दोन्ही पदाधिकार्‍यांनी बाबर कुटूंबियांची बाजू घेतल्याने या प्रकरणाला राजकीय वेगळेच वळण लागले असल्याने कांदलगाव बाबर ऊस प्रकरणाकडे संपूर्ण इंदापुर तालुक्याचे लक्ष लागून राहिले असून हे प्रकरण सध्या लोकांच्या चर्चेचा विषय ठरतेय सुमन बाबर यांनी पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या नावाने सुसाईड नोट लिहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हे प्रकरण मोठ्या प्रमाणात चिघळत चालले आहे.१७ डिसेंबर रोजी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अँड.राहुल मखरे यांनी इंदापुर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यावर अनेक गंभीरपणे आरोप पत्रकार परिषदेत पुराव्यांच्या आधारित केले आहेत त्याचप्रमाणे पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे इंदापुर तालुका अध्यक्ष संजय सोनवणे यांनी पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर तसेच पद्मामाकर बाबर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाचे खंडण करत १७ डिसेंबर रोजी पत्रकार परिषेद घेऊन संबंधित दोन्ही व्यक्तीची ठामपणे बाजू पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांन समोर मांडली

इंदापुर तालुक्यातील बाबर ऊस प्रकरणासंदर्भात इंदापुर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर हे काही दिवस मौन धरून बसले होते या प्रकरणा संदर्भात दि. १९ डिसेंबर रोजी १ वाजता पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी पत्रकार परिषद आयोजित करून कांदलगाव येथील बाबर प्रकरणावरती आपली बाजू प्रसार माध्यमासमोर मांडली
लोकशाही मध्ये प्रत्येकाला लिहीण्याचा,बोलण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार आहे.अँड राहुल मखरे यांनी माझ्यावरती जे आरोप केले आहेत ते निव्वळ खोटे आहेत असे आरोप करून ते माझ्यावर चिखलफेक करण्याचे काम करत आहेत. गुन्हेगारी पार्श्र्वभुमी असलेल्या व्यक्तीला ते पाठीशी घालत आहेत यामध्ये सत्य काही नाही जाणीवपूर्वक मला या प्रकरणात टार्गेट केल जातेय माझ्यावर केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही मी इंदापुर पोलीस स्टेशनचा चार्ज घेण्याअगोदर घडलेल्या गुन्ह्यात मला अडकवले जातेय.मी माझ्या पोलिस वर्दीशी प्रामाणिक आहे वर्दीला डाग लागेल असे कोणतेही गैरवर्तन मी अद्याप केलेले नाही मी बाबर कुटुंबातील लोकांना अपमानास्पद असे शब्द बोललो नाही मी स्वतःजातीने बाबर यांच्या जमिनीची पाहाणी केली व जमिनीची कागदपत्रे पाहून प्रविण बाबर यांच्यावर ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पत्रकारांना जे दिसत तेच पत्रकारांनी छापावे मी चुकीच वागलो असेल ते देखील पत्रकारांनी छापावे आणि माझी चुक माझ्या लक्षात आणून द्यावी.उगीच विनाकारण माझ्यावर खोटेनाटे आरोप करून वर्दीला डाग लावण्याचा खोडसाळपणा अँड राहुल मखरे यांनी चालवला आहे तो त्यांनी तात्काळ थांबवावा.मी आंदोलनास बसलेले कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून हे प्रकरण मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. मी पोलीस निरीक्षक पदाचा वापर नेहमीच गोरगरीबांच्या न्याय हक्कासाठीच केला असून यापुढेही गोरगरीबांच्या न्याय हक्कासाठी करणार असे इंदापुर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर म्हणाले 

सुमन गणपत बाबर यांनी जो विष घेऊन माझ्यावर आरोप ठेवला आहे तो एकदम चुकीचा आहे त्यांची तक्रार इंदापूर पोलिसांनी फेटाळली नाही शिवाय कोणतेही गैरवर्तन झाले नाही इंदापूर पोलिसांनी घेतलेली तक्रार त्यांनी कोर्टात देखील सादर केली आहे शिवाय सुमन बाबर यांनी लिहलेली सुसाईट नोटच्या मुळाशी जाऊन यांचा तपास पोलीस बारकाईने करणार आहेत.माझ्यावर कोणाचाही दबाव नाही किंवा माझे आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे कोणतेही लागेबांधे नाहीत बाबर यांच्या ऊस प्रकरणा संदर्भात योग्य तो मार्ग काढला जाईल जे दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा