Breaking

रविवार, २० डिसेंबर, २०२०

कांदलगाव ऊस प्रकरणी पीपल रिपब्लिकन पार्टी करणार बेमुदत धरणे आंदोलन : संजय सोनवणे.



कांदलगाव ऊस प्रकरणी पीपल रिपब्लिकन पार्टी करणार बेमुदत धरणे आंदोलन : संजय सोनवणे.

इंदापूर : प्रतिनिधी शिवाजी पवार

इंदापूर तालुक्यातील कांदलगाव येथील प्रवीण बाबर व डॉ. सचिन बाबर आणि संबंधितांवर ३९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात इंदापूर पोलिस स्टेशन समोर दि. २०\१२\ २०२०पासून बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांनी निवेदनाद्वारे दिली.

या वेळी बोलताना सोनवणे म्हणाले की, कांदलगाव तालुका इंदापूर येथील प्रवीण गणपत बाबर व कुटुंबातील व्यक्तीवर अन्यायग्रस्त पद्माकर बाबर यांनी दिलेल्या तक्रारी अर्जावरुन कारवाई करण्यात यावी,डॉ. सचिन बाबर यांना तात्काळ अटक करावी.डॉ. सचिन बाबर,यांनी सौ. सुमन बाबर, यांना अकलूज येथे हलवले. त्या हॉस्पिटलची सखोल चौकशी करण्यात यावी, आईला औषध दिले म्हणून व आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून ३०९ चा गुन्हा दाखल करण्यात यावा व आत्महत्या करणे कायद्याने गुन्हा असून संबंधित सुमन बाबर यांच्यावरही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हे दाखल करण्यात यावे. कांदलगाव येथील सरपंच रविंद्र पाटील यांनी बेकायदेशीरपणे गुंड प्रवीण बाबर यांना जमीन तुमचीच आहे, असा महसूल विभागाचा अधिकार नसताना दाखला देऊन बाबर विरुद्ध बाबर असा वाद वाढवल्यास जबाबदार धरुन फौजदारी गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करण्यात यावी.त्यांचे सरपंच पद रद्द करण्यात यावे, कांदलगाव येथील अनेक कुटुंबावर या प्रवीण बाबर व त्यांच्या कुटुंबीयांनी पद्माकर बाबर सारखीच जमीन बळकावून अन्याय  केलेला आहे. याची प्रशासनाने चौकशी करुन त्यांना न्याय देण्यात यावा. इंदापूर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे व त्याताकाहीच तथ्य नाही. तरी अामच्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत धरणे अंदोलन करणार असल्याचे संजय सोनवणे यांनी माहीती दिली.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंञी मा.ना. उद्धवजी ठाकरे, पुणे जिल्हाधिकारी, ग्रामिण पोलीस अधीक्षकापुणे, इंदापूर तहसीलदार, पोलीस निरीक्षक इंदापूर यांना निवेदनाच्या प्रती पाठवलेची माहिती सोनवणे यांनी सांगीतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा