*ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 98 जण तडीपार*
*टेंभुर्णी प्रतिनिधी*
महाराष्ट्रा मध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणूका चालू असून प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. मतदान तोंडावरती आले असून यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील 98 उपद्रवी लोकांना सीआरपीसी 144 प्रमाणे दिनांक 14/1/2021 ते 15/1/2021 या कालावधीमध्ये गावामधून तडीपार करण्यात आले आहे.तसेच सीआरपीसी 110 प्रमाणे 31 लोकांवर कार्यवाही करण्यात आलेली आहे सीआरपीसी 107 प्रमाणे 141 लोकांवर कार्यवाही करण्यात आली आहे तसेच सीआरपीसी 149 प्रमाणे 652 नोटीस देण्यात आलेली आहे प्रोवी अधिनियम 93 प्रमाणे 13 कारवाया करण्यात आलेल्या आहेत तसेच ग्रामपंचायत निवडणूक अनुषंगाने 34 गावांमध्ये मीटिंग घेऊन निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे आवाहन केलेले आहे व कोणी कायद्याचे उल्लंघन केले त्याच्याविरुद्ध अत्यंत कडक कारवाई करण्यात येणार आहे याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी अशी माहिती पोलीस टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी दिली आहे
*सविस्तर वृतांत लवकरच AJ 24 Taas News Maharashtra मध्ये*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा