माढा रोटरी क्लबच्या राष्ट्राचे शिल्पकार पुरस्काराचे मोठ्या थाटात वितरण
टेंभुर्णी / प्रतिनिधी- माढा येथील जगदाळे मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय राष्ट्राचे शिल्पकार पुरस्काराचे वितरण मोठ्या थाटात व उत्साही वातावरणात प्रमुख पाहुणे सोलापूर जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.रामचंद्र कोरडे व प्रांतपाल हरीश मोटवानी, रोटरीचे अध्यक्ष प्रा.अशोक लोंढे, प्रांतपाल डॉ. सुभाष पाटील यांच्या हस्ते 19 जानेवारी रोजी करण्यात आले.
रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा.अशोक लोंढे यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक, पर्यावरण व शैक्षणिक कार्याचा आढावा सांगितला. राष्ट्र बांधणीचे काम खऱ्या अर्थाने शिक्षकच करत असल्याने शिक्षण प्रक्रियेत नावीन्य व उपक्रमशीलता जोपासणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रोजेक्ट डायरेक्टर प्रवीण भांगे सर यांनी राष्ट्र शिल्पकार पुरस्कार निवड प्रक्रिया विशद केली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे यांनी कवयित्री बहिणाबाई यांच्या कवितेमधील चारोळ्यांचे दाखले देत संस्कार, गुणवत्ता व कौशल्य ही त्रिसूत्री विद्यार्थ्यांमध्ये सुरवातीच्या काळात रुजवणे गरजेचे असल्याचे सांगितले. यासाठी विद्यार्थी, शिक्षक व पालक या तीन घटकांनी एकत्र येऊन शाळेतील मुलांच्या गुणात्मक वाढीबरोबर कौशल्य विकास करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रो. हरीश मोटवानी यांनी रोटरीचे भारत साक्षरता अभियान संदर्भात माहिती दिली. संपूर्ण साक्षरतेसोबाबत गुणवत्तायुक्त शिक्षण देण्यासाठी आवश्यक घटकावर रोटरी काम करत असल्याचे सांगितले.यामध्ये शिक्षक प्रशिक्षण, ई लर्निंग, प्रौढ साक्षरता, मुलांचा सर्वांगीण विकास व आनंदी शाळा इत्यादी घटकावर रोटरीमार्फत विविध उपक्रम राबवत असल्याचे सांगितले.
राष्ट्र शिल्पकार पुरस्कारासाठी जिल्ह्यातील शिवाजी दिगंबर येडे (करमाळा), कल्पना गोविंद घाडगे (माढा), राजश्री काशिनाथ बुगडे (मंगळवेढा), मल्लिनाथ चंद्रशेखर निंबर्गी (उत्तर सोलापूर), सुनिता यशवंत वनस्कर (दक्षिण सोलापूर), धनाजी पोपट हेगडकर (माळशिरस), खुशालद्दीन उस्मान शेख (सांगोला), महेश नवनाथ गोडगे(मोहोळ), गणपत रघुनाथ खंदारे (बार्शी), राजश्री शरणप्पा उप्पीन (अक्कलकोट), ज्ञानेश्वर सुखदेव विजागत (पंढरपूर) या 11 शिक्षकांना गौरविण्यात आले.
सोलापूर जिल्हा प्रशिक्षण संस्थेत कार्यरत असणारे चंद्रकांत शामराव नरळे (अधिव्याख्याता), अविनाश विजयकुमार शिंदे ( जिल्हा समन्वयक), रेवणनाथ सुखदेव आदलिंग (विषय साधनव्यक्ती), प्रभा गहिनीनाथ चव्हाण (विशेष तज्ञ), विद्या अंबादास रोटे( विशेष शिक्षक) यांचेसह आश्रमशाळेत कार्यरत असणारे प्रविण अरुण घाडगे (माढा) ज्ञानदेव हरिश्चंद्र डुकरे (जामगाव) प्रकाश ज्ञानदेव जाधव (केवड) रामा गोरख घोगरे (अंजनगाव खे.) याबरोबर अंगणवाडी सेविका किसनाबाई अर्जुन शिंदे इत्यादी 23 उपक्रमशील शिक्षकांचा राष्ट्र शिल्पकार पुरस्कार देऊन सन्मान केला.
राज्य शासनाच्या मॉडेल स्कूल उपक्रमांतर्गत निवडलेल्या 300 शाळा मध्ये निवड झालेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माढा मुले 1 चे मुख्याद्यापक तळेकर मॅडम, स्कुल कमिटीचे अध्यक्ष धैर्यशील भांगे व शाळेचा स्टाफ यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच रोटरी क्लबकडून ई लर्निंग व हॅपी स्कूल अंतर्गत जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक नागेश खेडकर व स्कूल कमिटीचे अध्यक्ष धैर्यशील भांगे यांचेकडे शाळेसाठी स्मार्ट टी.व्ही.भेट देण्यात आला.
याप्रसंगी प्रांतपाल डॉ. सुभाष पाटील, रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सोमेश्वर टोंगळे, माजी अध्यक्ष नागनाथ घाडगे,दिनेश जगदाळे,भारत लटके, मार्केट कमिटीचे संचालक हनुमंत पाडुळे,आप्पा घाडगे, नागेशजी देशमुख,बंडू पवार,माढा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मदन चवरे, प्रेस क्लबचे उपाध्यक्ष तथा आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड सर,लक्ष्मण राऊत सर,अमर गायकवाड यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन माजी सचिव रमेश कदम यांनी केलें.आभार रोटरीचे सचिव किरण चव्हाण यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा