Breaking

मंगळवार, १९ जानेवारी, २०२१

उदगीरमध्ये मारहाण झालेल्या युवकाचा मृत्यु झाल्याने शहरात दगडफेक तनावाचे वातावरण!


*उदगीरमध्ये मारहाण झालेल्या युवकाचा मृत्यु झाल्याने  शहरात दगडफेक  तनावाचे वातावरण!* 


*लातुर जिल्हा प्रतिनिधि  /जीवन भोसले*

*उदगीर* (लातूर )गेल्या आठ दिवसापुर्वी मारहाण झालेल्या एका उदगीर युवकाचा येथिल खजगी रुग्नालयात  मृत्यू झाला.  त्यानंतर  नाकेवाईकांनी प्रेत उपविभागीय पोलिस अधिकारी  कार्यालयसमोर ठेऊन आरोपिंना अटक करण्याची मागणी केली. शहर पोलिस ठाण्यासमोर  जमावाने दगडफेक केली ,
 या घटनेचे  वृत्त शहरात कळताच अवघ्या अर्ध्या त्यात शहर सामसुम झाले,  
अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून घरी जाण्यास पसंद केले  या बाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहीती अशी की  तोंडार (ता,  उदगीर)  चौकात अाँटो  पांईटवर  चौकात बुधवारी ता(13) रात्री 8च्या सुमारास  पैशाच्या देण्याघेण्याच्या  वादातुन मारहान झाली होती  , आरोपी  तानाजी फुले,  राजकुमार  बिरादार,  रा,  (देघेही हैबतपूर,  )महेश बिरादार,  शांतवीर  बिरादार (दोघेही राहनार  मलकापूर)  यांनी संगनमत करून  लोखंडी गज व काट्या व हाँकी स्टीकचा वापर करून  फिर्यादीचा चुलत भाऊ बसी अहमद सैयद,  (वय 30)रा हैबतपूर यास तु घेतलेले पैसे परत कर म्हनत  शिवीगाळ केली  या आशयाची फिर्याद  चुलत भाऊ  फिरोज  निजामसाब सय्यद (रा,  हैबतपूर)  याने  रविवारी  दिल्यावरून ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 
मंगळवारी (ता.19) सकाळी उपचार घेत असताना या मारहान झालेल्या युवकाचा मृत्यु  झाला. त़्या नंतर  हा मृत्यु देह नाकेवाईकांनी उपविभागीय पोलिस अघिकारी  कार्यालय समोर ठेवला,  या अरोपीला जोपर्यंत अटक करनार नाही तोपर्यंत  आम्ही  अत्यंविधी करणार नाही,   असा पवित्रा घेतला हरी हळू हळू हि वार्ता शहरात पसरताच पोलिस ठाणे शहराच्या  आवारात जमाव  निर्माण  झाला,  शहर पोलीस ठाण्या समोर या जमावाने  दगडफेक  सुरूवात केली यात काही मोटार सायकली,  भेळच्या गाड्याचे नुकसान झाले आहे,   त्या नंतर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला,   
 जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा  गुन्हा  बदलुन जिवे मारला असलेचा  गुन्हा दाखल करून अरोपिंना तात्काळ अटक  करण्याचे अश्वासन पोलिसांनी या नाकेवाईकांना दिले, त्यानंतर हा शवविच्छेदनासाठी  घेऊन जाण़्यात आला 
या घटनेचा वृत्त कळताच शहरात तनावाची परिस्थीती निर्माण झाली,  चौबारा रोड हणूमान कट्टा,  मुक्कावर चौक,  मोंढा रोड,  देगलुर रोड,  या भागातील अनेक व्यापाऱ्यांनी आपले दुकाने  तात्काळ बंद करून घरी जाने पसंद केले,   या दरम्यान  तातडीने उदगीरात दाखल झालेले आतीरीक्त  जिल्हा पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव यांनी  कुठल्याही  अफवेला बळी न पडता  नागरीकांनी  शांतता राखण्याचे  आवाहन केले, 
या दगड फेकीत तिन जन जखमी झाले,  कामानिमित़्य ओैरंगाबाद  येथून उदगीरला येत असलेले उद्धव पाटील,  हे शहरातील पोलिस ठाण्याच़्या जवळ आले असता जमावाने त्यांच्या कार वर दगडफेक केली त्याच ते जखमी झाले आहेत, त्यांच्या डोक्याला व हातावर मर लागला आहे, 
देवणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक  श्री,  शिंगारे  कर्तव्यावर हजर होत असताना त्यांच्या गाडीवर  जमावाने दगडफेक केली,  त्यात तेही  जखमी झाले,  आहेत,  
नळेगाव रोडवर झालेल्या दगडफेकित  डाँ. ताहेर यांच्या मातोश्री जखमी झाल्या आहेत,  
जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे उदगीरात दाखलं झाले असुन जिल्हा भरातुन  अवश्यक असनारी पोलीस कुमक उदगीरला मागवण्यात आली आहे, 

शहर पोलिस ठाण्यात मृत्यु देह आणून ठेवल्यास नंतर हळू हळू दोनसे आडीचसे लोकांचा जमाव एकत्र  जमला,   या  जमावाला हळू हळू पोलिस ठाण्याच़्या  बाहेर करण्यात आले,   ठाणे आवाराच्या बाहेर जात असताना  या जमावाने,  पोलिस ठाण्याकडे दगडफेक करायला सुरूवात केली, या वेळी  जवळपास दोनशेचा जमाव अन केवळ  विस पोलिस  असल्याती स्थिती येथे होती,  संवेदनशील उदगीरची दंगलीची पार्श्वभूमी असताना ही  येथे संख्या बळ कमी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, 
हि घटना घडल्या नंतर व मारहान झालेल्या युवक गंभीर अवस्थेत  दवाखाण्यात असताना तब्बल चार दिवस  कोणत्या ही स्वरूपाचा गून्हा दाखल करण्यात आला नाही,  हा गुन्हा का दाखल झाला नाही? अशी विचारणा या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डँनियल बेन यांना करण्यात आली. ही घटना पोलिस विभाग पाढीमाघे घात असल्याचा  आरोपही करण्यात आला,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा