*आजचा विजय म्हणजे जनतेचा विजय संजय पाटील- भिमानगर कर
टेंभुर्णी प्रतिनिधी
आजचा विजय प्रतेक मतदाराचा , आज चा विजय ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष सहकार्य केल त्यांचा , आजचा विजय म्हणजे मागील 20 वर्षे सर्वसामान्य जनतेची व गावा च्या विकासा साठी जे काम केल त्याची पोच पावती , आजचा विजय म्हणजे सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन सर्वच घटकांनी एकदीलान मनापासुन जे योगदान दील त्या प्रतेका चा ,
आज च्या विजयाच श्रेय उमेदवारांच्या बरोबरच ज्यांनी पडद्या मागे राहुन मतदान रूपी आशीर्वाद देले व सहकार्य केल त्या प्रतेक शुभचिंतकांचा ,
आज चा विजय म्हणजे सहनशिलतेचा , आजचा विजय विनयशिलतेचा ,
हा विजय कोणा एकाचा नाही सर्वच जनता जनार्धना चा हा आजचा विजय..
आज आपण रांझणी - भिमानगर च्या जनतेने जो विजयी कौल दीला तो मी पॅनल प्रमुख या नात्याने नम्र पणे स्विकारतो व या विजयानी हुरळुन न जाता आपण माझ्यावर आणखी जबाबदारीच ओझ सोपवलय याची जानीव ठेऊन ती जबाबदारी तेवढ्यात ताकतीने पार पाडील व जनतेची कामे करण्याचा प्रयत्न करेल ही जबाबदारी पार पाडताना जवळचा लांबचा विरोधक आपला हे न पहाता सर्वांची कामे करेल हा सर्वांना विश्वास देतो ..
निवडणुक म्हणल कि हार जित आलीच आमच्या वार्ड क्र.1 मधील पराभुत उमेदवारांनी पण खचुन न जाता येथुन पुढ पण त्याच जोमान जनतेच्या आडी आडचनी सोडवण्या साठी प्रयत्न शील राहव आजच्या पराभवातच उद्याचा विजय लपलेला आसतो ही खुन गाठ मनाशी बांधुन आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आसुन विकास कामासाठी नेहमीच सहकार्य करू ..
आत्ता निवडणुक संपली निकाल झाला येथुन पुढे सर्व 11 विजयी उमेदवारांनी एक जुटीने कोणती ही मनात शंका न आनता गावाच्या विकासाच्या दृष्टी ने एकमुखाने चांगले निर्णय घेऊन गावाच्या विकास कामासाठी झटुन काम कराव व सहकार्य कराव ही सर्वांना नम्र विनंती ...
या निवडणुक काळात कळत नकळत जानते अजानते पणे माझ्याकडुन किंवा माझ्या कार्यकर्त्याकडुन जर कोणाच मन दुखावल आसेल तर मी पॅनल प्रमुख या नात्याने दीलगीरी व्यक्त करतो व येथुन पुढील काळात आपण सर्व एकञीत पणे गावाच्या समाजाच्या साठी काम करू व या साठी आपण सगळेच सहकार्य कराल ही आपेक्षा व्यक्त करतो व ते सहकार्य आपण कराल हा विश्वास व्यक्त करून परत एकदा सर्व मतदार जनताजनार्धनाचे मी पॅनल प्रमुख या नात्याने आभार मानतो ॠण व्यक्त करतो ..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा