Breaking

सोमवार, १८ जानेवारी, २०२१

जातेगावमध्ये संतोष वारे गटाचा दारुण पराभव**

जातेगावमध्ये संतोष वारे गटाचा दारुण पराभव*

AJ 24 तास न्यूज
*करमाळा तालुका प्रतिनिधी - /अतुल वारे पाटील*

 संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या जातेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच जिल्हा परिषद सदस्य संतोष वारे गटाला प्रचंड पराभवाचा सामना करावा लागला. अतिशय अटीतटीच्या लढतीत प्रमोद वारे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्वच्या सर्व 9 जागांवर विजय संपादन केला. विजयी उमेदारांसह नागरिकांनी निकालानंतर प्रचंड जल्लोष करत आनंद साजरा केला.
         गेली 10 वर्षे या ग्रामपंचायत वर संतोष वारे यांचे प्राबल्य आहे.  यावेळेस संतोष वारे यांच्या जवळील मंडळींनी बंड केल्याने तालुक्याचे या निवडणुकीकडे लक्ष वेधले गेले होते. शिंदे गट,जगताप गट, बागल गट ,संजय मामा गट सर्वांनी एकत्रित सूत्रबद्ध प्रचार यंत्रणा राबवत हा विजय खेचून आणला. 
     *या निकालानंतर बोलताना या विजयाचे शिल्पकार प्रमोद वारे म्हणाले की, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढत झाली.विरोधकांनी पैशाची प्रचंड लयलूट केली परंतु विकासासाठी आसुसलेल्या सुज्ञ नागरीकांनी आम्हाला जातेगाच्या विकासासाठी  काम करण्याची संधी दिली असून आगामी काळात जातेगावचा नेत्रदीपक विकास साधणे यालाच आमचे प्राधान्य असेल*
 
*करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व जिल्हा परिषद सदस्य संतोष वारे यांनी या पराभवानंतर बोलताना सांगितले की ,जनता जनार्दनाने दिलेला कौल आम्हाला मान्य असून झालेल्या चुकांचे आम्ही आत्मपरीक्षण करू. सत्ता नसली तरीसुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून जनतेची सेवा करत राहू*
  विजयी उमेदवार-  *अच्युत काशिनाथ कामटे, छगन जगन्नाथ ससाने,  सौ मनिषा अशोक शिंदे ,सौ सुमित्रा बाळासाहेब धुमाळ ,आजिनाथ लालासाहेब निगडे, सौ रोहिणी बाबासाहेब शिंदे ,सौ गौरी प्रमोद वारे, सौ सुनंदा ज्ञानदेव वारे , सौ प्रज्योती रमेश पाटील*.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा