Breaking

रविवार, ३ जानेवारी, २०२१

किनवट येथे विशेष डाक मेळावानांदेड

किनवट येथे विशेष डाक मेळावा

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

नांदेड डाक अधीक्षक यांच्या आदेशानुसार किनवट सारख्या आदिवासी बहुल अतिदुर्गम भागात सर्वसामान्य नागरिकांना डाक सेवेचा जास्तीत जास्त फायला घेता यावा यासाठी दिनांक-०४ जानेवारी २०२१ ते दिनांक-१४ जानेवारी २०२१ डाक मेळावा आयोजित केला आहे.सदरील मेळावा हा मुख्य पोस्ट ऑफीस किनवट येथे आयोजित केला आहे.आणि त्या अंतर्गत खालील प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

डाक मेळाव्याच्या आयोजनानिमित्त सर्व प्रकारचे पोस्ट ऑफिसचे खाते (बचत खाते,आरडी खाते,सुकन्या खाते,पीपीएफ खाते इत्यादी

तसेच विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी (निराधार, मातृत्व वंदना,शिष्यवृत्ती साठी इत्यादी IPPB खाते प्रधानमंत्री योजने अंतर्गत असलेले खाते सदरील मेळाव्यात काढण्यात येतील.

नवीन आधार नोंदणी तसेच आधार अद्ययावतीकरण या मेळाव्यात करण्यात येतील.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा