Breaking

रविवार, ३ जानेवारी, २०२१

गणेशराव ढेपे यांना पत्रकारिता पुरस्कार जाहीर...




गणेशराव ढेपे यांना पत्रकारिता पुरस्कार जाहीर...

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

नांदेड,ता.2; नांदेड येथील सामाजिक कार्यकरणारी सेवाभावी संस्था युवा प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा सन 2020 मधील उत्कृष्ट वार्तांकणाचा पत्रकारिता पुरस्कार सकाळचे मारतळा बातमीदार गणेश ढेपे यांना जाहीर झाला आहे.
  युवा प्रतिष्ठानच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकारांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान व्हावा,यासाठी उत्कृष्ट वार्ताकन असलेल्या सामाजिक बातमीची निवड केली जाते. गणेश ढेपे यांच्या (ता. एप्रिल 2020) सकाळ अंकातील कोरोना लाँकडानमुळे मजुरांचा रोजगार बुडाल्याने होणारी उपासमार पाहून एक संवेदनशील संन्याशी आपल्या झोळीतील भिक्षाही भुकेल्यांना दान करणारा देवदूत या बातमीची पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पत्र संस्थेचे कार्यालयीन सचिव डॉ.प्रशांत तावडे यांच्याकडून ढेपे यांना प्राप्त झाले आहे.
लवकरच नांदेड येथे पुरस्कार प्रदान सोहळा आहे.उत्कृष्ट वार्तांकणाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल गणेश ढेपे यांचे पत्रकार विठ्ठल ताटे संजय पाटील देविदास डांगे गणेश लोखंडे संजय देशमुख प्रदीप देशमुख उत्तम हंबर्डे बाळासाहेब शिंदे नागेश वडवळे संतोष कऱ्हाळे सूर्यकांत माली पाटील संतोष पाटील बालाजी सिरसाट यांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा