जेऊर मध्ये जिजाऊ ब्रिगेड च्या वतिने सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात हात साजरी*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
जेऊर येथे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी बोलताना जिजाऊ ब्रिगेडच्या प्रियंका खटके यांच्या प्रमुख उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना प्रियांका खटके म्हनाल्या की,
आपण सर्व महिला वटपौर्णिमा साजरी करतोकारण वटपौर्णिमेचे सावित्रीने तिचा नवरा परत आणला म्हणून सर्व महिला वड पुजायला जाता पण ज्या सावित्रीने आपल्या सारखे लाखो स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडून दिले आणि त्यांचे आयुष्य अगदी कवडीमोल झालं होतं त्या आयुष्याला नवी झळाळी दिली आणि शिक्षणाचे बाळकडू स्त्रीला पाजलं आणि त्यासाठी तिचे उभ आयुष्य झिजवले त्या सावित्री ची जयंती आपल्या लक्षात राहत नाही ही मोठी शोकांतिका आहे.आपण त्यासाठी वेळ काढू शकत नाही .प्रत्येक स्त्रीने घरोघरी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करणे गरजेचे आहे. यावेळी सिध्दी वळेकर व सिध्दी पाटील* यांनी मनोगत व्यक्त केले. आभार जिजाऊ ब्रिगेड च्या जेऊर शहर अध्यक्षा पल्लवी शिंदे* यांनी मानले.
यावेळी सुभद्राबाई लोंढे,चंद्रभागा सरगुले,प्रियंका साबळे,किरण वळेकर,गंगा लोंढे,मिनाक्षी पाटिल,जयश्री सलगर,आरती गारुडी,वैष्णवी मोहिते,पूनम कदम,पुष्पा निर्मळ,रामकुवर निर्मळ,समृध्दी मोहिते,अर्चना निर्मळ,पावणी सलगर,रितु सलगर,सुवर्णा मोहिते,राणी मोहिते,सुवर्णा मोहिते,सुवर्णा घाडगे,प्रगती मोहिते,पुर्वा मोहिते,अनुसया महामुनी,अनुष्का जाधव,आशा पाटिल,लता कोठावळे,वस्चला लोंढे,तब्बयुम काझी सैफन इत्यादी महिला उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा