Breaking

रविवार, ३१ जानेवारी, २०२१

 



इंदापूर येथे सोमवारी भाजपचे निषेध आंदोलन- शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडण्यास तीव्र विरोध
इंदापूर: प्रतिनिधी शिवाजी पवार


             इंदापूर येथे महावितरण कंपनीच्या  कार्यालयासमोर सोमवार  ( दि. ०१\ ०२ \२०२१ ) रोजी सकाळी १० वा. ३० मि. भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजीमंत्री मा. हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाआघाडी सरकारने सुरु केलेल्या शेतीपंपाच्या  वीज कनेक्शन तोडणी मोहीमेच्या निषेधार्थ आंदोलन केले जाणार आहे.


      आघाडी सरकारने शेतीसाठीचे वीज कनेक्शन तोडण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याची परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांची व घरगुती ग्राहकांची वीज तोडणी मोहीम थांबवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश भाजपने केली आहे. 


        या आंदोलनामध्ये भाजप व महायुतीच्या  मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तरी या आंदोलनामध्ये इंदापूर तालुक्यातून मोठ्या संख्येने शेतकर्‍यांना ही सहभागी होण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

_______________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा