Breaking

रविवार, ३१ जानेवारी, २०२१

नांदेड सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती-२०२१ च्या प्रसिद्धी प्रमुख पदी बालाजी सिरसाट यांची निवड!---------------------------------------------------




नांदेड सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती-२०२१ च्या प्रसिद्धी प्रमुख पदी बालाजी सिरसाट यांची निवड!
---------------------------------------------------

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

नांदेड शहरातील नवा मोंढा येथील मराठा सेवा संघ आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्याला गेल्या तीस वर्षाची विशेष परंपरा आहे. विविध कार्यक्रम व वैचारिक प्रबोधनाने हजारोंच्या संख्येने शिवप्रेमींचा उपस्थित जन समुदाय,महिला रॅली,ढोलपथक,शिवकालीन मर्दानी खेळ,शिवविवाह,लेझीम पथक अशा भरगच्च कार्यक्रमाचा समावेश असलेल्या मराठा सेवा संघ आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती-२०२१ च्या प्रसिद्धी प्रमुख पदी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी पाटील सिरसाट यांची निवड करण्यात आल्याची घोषणा शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष व स्वागत अध्यक्ष यांनी जाहीर केले.

सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती-२०२१प्रसिद्धी प्रमुख यांचे अनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा