*भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सांबीत पात्रा यांचा सत्कार.*
तुळजापूर प्रतिनिधी रुपेश डोलारे ,उस्मानाबाद
तुळजापूर दिनांक 1, भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते. ओएनजीसी संचालक सांबित पात्रा यांनी आज नववर्ष दिनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन देशातून कोरोनाचे संकट दूर होवो अशी प्रार्थना केली.
दर्शना नंतर नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी पात्रा यांचा सत्कार केला.यावेळी सोलापूरचे आ. विजयकुमार देशमुख.नगरसेवक अभिजित कदम.गुरुनाथ बडुरे शिवानंद पाटील आदि उपस्थित होते.यावेळी रोचकरी यांनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी विविध राज्यातून भाविक दररोज हजारोच्या संख्येने तुळजापुरात येतात भाविंकाच्या सोयीसाठी येथील रेल्वे मार्गाच्या कामाला गती द्यावी व या तीर्थक्षेत्राचा केंद्रीय पर्यटन क्षेत्राच्या यादीत समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकार कडे प्रयत्न करण्याची मागणी निवेदना द्वारे पात्रा यांच्याकडे रोचकरी यांनी केली.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा