Breaking

गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

पोथरे येथे राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीचा यशस्वी झेंडा:शिवाजी जाधव* *

पोथरे येथे राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे  महाविकास आघाडीचा  यशस्वी झेंडा:शिवाजी जाधव*

 *करमाळा तालुका प्रतिनिधी - अतुल वारे पाटील*
     
  करमाळा तालुक्यातील महत्वपूर्ण अशा पोथरे ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे.
इथे राष्ट्रवादीच्या पाठींब्यामुळे बागल पाटील युतीला घवघवीत असे यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव यांनी दिली आहे.
      याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की,पोथरे गावात शिवसेनेत असणाऱ्या बागल-पाटील युतीच्या पॅनल विरोधात शिंदे-जगताप यांचे पॅनल होते.आम्ही राष्ट्रवादी पदवीधर संघाचे नेते नितीनभाऊ झिंजाडे यांच्या नेतृत्वाखाली बागल पाटील युतील सहकार्य केले यामूळे निवडून आलेले सर्वच उमेदवार अपेक्षेपेक्षा जास्त मतांनी निवडून आले आहेत.या निवडणुकीत बागल पाटील युतीला 9 जागा मिळाल्या असून शिंदे-जगताप गटाला अवघ्या 2 जगावर समाधान मानावे लागले आहे.या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे पुढीलप्रमाणे उमेदवार वॉर्ड क्र.1 मधून अंकुश शिंदे,दीपाली जाधव,वार्ड क्र.2 मध्ये जनाबाई शिंदे,वॉर्ड क्र.3 मधून रघुवीर जाधव,संतोष ठोंबरे, दीपाली झिंजाडे,वार्ड क्र.4 मधून सुनीता झिंजाडे,धनंजय झिंजाडे, राणी काळे  निवडून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा