प्रत्येक निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक - मुख्याध्यापक औदुंबर चव्हाण
कापसेवाडी-हटकरवाडी येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती अभियान
माढा / प्रतिनिधी-
भारतीय लोकशाही मजबूत व बळकट करण्यासाठी वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीने आपले नाव शासकीय यंत्रणेमार्फत मतदार यादीत नोंदवून प्रत्येक निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क आवर्जून बजावला पाहिजे असे प्रतिपादन श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक औदुंबर चव्हाण यांनी केले आहे.
ते 25 जानेवारी रोजी कापसेवाडी- हटकरवाडी ता.माढा राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त माध्यमिक व प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित जनजागृती अभियानात बोलत होते.
प्रास्ताविक प्राथमिक शाळेचे सहशिक्षक प्रसन्न दिवाणजी यांनी केले.
याप्रसंगी हटकरवाडी येथील नूतन ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर गवळी, अनंता बगडे,बबन बगडे यांचा प्राथमिक शाळेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना सहशिक्षक सुनील खोत म्हणाले की, संविधानातील तरतुदीनुसार प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा हक्क आहे परंतु काही लोक या दिवशी सुट्टी असताना सुद्धा मतदानाचा हक्क बजावत नाहीत.शिवाय अनेकजण वयाची 18 वर्षे पूर्ण होऊनही मतदार यादीत नाव नोंदवित नाहीत हे लोकशाहीला घातक आहे त्यामुळेच गावोगावी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती अभियान राबवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. 5 वी ते 8 वीचे वर्ग सुरु होणार आहेत त्यामुळे पालकांनी व विद्यार्थ्यांनी शासनाने कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सांगितलेले सर्व नियम व आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले
यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब पाटील, राजकुमार क्षीरसागर,शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष जनार्धन खोत,माजी सरपंच राजेंद्र खोत, प्रवीणकुमार लटके,तनुजा तांबोळी, सुनील खोत,सागर राजगुरू, तंटामुक्ती अध्यक्ष साहेबराव गवळी,पोलीस पाटील रामकृष्ण धावणे,मच्छिंद्र व्हळगळ,रोहिदास बगडे,वैजिनाथ व्हळगळ,वैजिनाथ सदगर,अनिल सदगर,धनाजी बगडे,नागनाथ सदगर,सागर बगडे,समाधान भांगे, गौतम जगताप,हरि जगताप,प्रभाकर कापसे,विष्णू जगताप,योगेश पवार, किरण भालेराव,विकास कापसे यांच्यासह अंगणवाडी शिक्षिका व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळी- कापसेवाडी-हटकरवाडी ता.माढा येथे ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक औदुंबर चव्हाण व इतर मान्यवर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा