मराठा सेवा संघाच्या शिवधर्म दिनदर्शिकेचे करमाळ्यात प्रकाशन*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
मराठा सेवा संघाच्या शिवधर्म दिनदर्शिकेचे करमाळा येथे थाटात प्रकाशन करण्यात आले. डॉ बाबुराव लावंड, डॉ बिभीषण सारंगकर, यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील ,डॉ महेश वीर,डॉ मनोज काळे,डॉ पोपट नेटके,डॉ सौ विनया सारंगकर आदींच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील,सचिव सचिन शिंदे, डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद तालुकाध्यक्ष अजित कणसे,कार्याध्यक्ष संतोष शितोळे,शरद पायघन, महेश निकत,आनंद कटारे,सौ किशोरी चुंबळकर, सूरज आतकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्वांनी दिनदर्शिकेची मांडणी, तसेच यामध्ये स्वामी विवेकानंद यांचा मांडण्यात आलेला जीवनप्रवास आदींचे कौतुक केले.तसेच बहुजन महापुरुषांचे कार्य सर्वदूर पोहोचण्यासाठी व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी घरोघरी ही दिनदर्शिका भिंतीवर लावण्याचे आवाहन केले.
अतुल वारे पाटील यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा