Breaking

शनिवार, २ जानेवारी, २०२१

टेंभुर्णी प्रेस क्लब च्या अध्यक्षपदी संतोष पाटील, उपाध्यक्ष सतीश काळे तर सचिव पदी सचिन होदाडे यांची बिनविरोध निवड*


*टेंभुर्णी प्रेस क्लब च्या अध्यक्षपदी संतोष पाटील, उपाध्यक्ष सतीश काळे तर सचिव पदी सचिन होदाडे यांची बिनविरोध निवड*
टेंभुर्णी (प्रतिनिधी):- टेंभुर्णी प्रेस क्लब ची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी संतोष पाटील, उपाध्यक्षपदी सतीश काळे तर सचिव पदी सचिन होदाडे यांची निवड सर्वानुमते अविरोध करण्यात आली. या निवडी मावळते अध्यक्ष सोपान ढगे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आल्या.

चांगल्या कामाचे समर्थन करून त्यास प्रसिद्धी देणे व वाईट कामाचे, वाईट विकृती विरुद्ध निर्भीडपणे आपली लेखणी चालविण्याचे सामर्थ्य हे सर्व पत्रकारांनी अंगीकारले पाहिजे.
शासन, प्रशासन व समाज यांच्यातील महत्वाचा  दुत म्हणून पत्रकरांकडे पाहिले जाते. त्यामुळे पत्रकारांनी आपले स्टेटस जपून राहिले पाहिजे.
असे ज्येष्ठ पत्रकार डी एस गायकवाड, सदाशिव पवार व सुहास साळुंखे यांनी सांगितले. व नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पत्रकार रघुनाथ बनसोडे यांनी आपल्या प्रस्ताविकात नूतन कार्यकारिणी निवडण्याची प्रस्तावना मांडली. त्यास पत्रकार अनिल जगताप यांनी अनुमोदन दिले. तर मावळते अध्यक्ष सोपान ढगे यांनी नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव यांच्या निवडी सर्वानुमते जाहीर केल्या. यावेळी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार डी एस गायकवाड, सोपान ढगे, सदाशिव पवार, सुहास  साळुंखे, रघुनाथ बनसोडे, अनिल जगताप, गणेश चौगुले, सतिश चांदगुडे आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा