नांदेड सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती-२०२१ च्या अध्यक्षपदी सतिश जाधव तर स्वागताध्यक्षपदी रमेश पवार यांची निवड!
---------------------------------------------------
दि.२८ नांदेड जिल्हा प्रतिनिधी)
बालाजी सिरसाट
*
नांदेड शहरातील नवा मोंढा येथील मराठा सेवा संघ आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्याला गेल्या तीस वर्षाची विशेष परंपरा आहे. विविध कार्यक्रम व वैचारिक प्रबोधनाने हजारोंच्या संख्येने शिवप्रेमींचा उपस्थित जन समुदाय,महिला रॅली,ढोलपथक,शिवकालीन मर्दानी खेळ,शिवविवाह,लेझीम पथक अशा भरगच्च कार्यक्रमाचा समावेश असलेल्या मराठा सेवा संघ सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती-२०२१ ची निवड करण्यासाठी यशवंतराव चव्हाण मराठा विद्यार्थी वसतिगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्राचार्य डाॅ पंजाबराव चव्हाण होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश प्रशिक्षक प्रा संतोष देवराये, मराठा सेवा संघाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष उध्दवराव सुर्यवंशी, उत्तर जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा डाॅ. विद्या पाटील यांची उपस्थिती होती. बैठकीची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ माॅसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून जिजाऊ वंदनेने झाली. या बैठकीत अत्यंत प्रतिष्ठेची आणि मानाची असलेली मराठा सेवा संघ आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती-२०२१ च्या अध्यक्षपदी मराठा सेवा संघाचे उत्तर जिल्हा सचिव सतिश पाटील जाधव यांची तर स्वागताध्यक्ष पदी मराठा सेवा संघाचे दक्षिण जिल्हा सचिव तथा व्याख्याते,लेखक रमेश पवार यांची निवड एकमताने करण्यात आली. समिती सचिव म्हणून पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील यांची तर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली.या बैठकीत कोवीड-१९च्या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या शिवजन्मोत्सव सोहळ्यातील विविध कार्यक्रमा बद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर यांनी केले तर,बैठकीस मार्गदर्शन प्राचार्य डाॅ पंजाबराव चव्हाण, प्रा.संतोष देवराये,उध्दवराव सुर्यवंशी,डाॅ.विद्या पाटील यांनी केले.सदर बैठकीस मराठा सेवा संघ जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.राधाकृष्ण होगे,राष्ट्रीय कृषी परिषदेचे विजयानंद भोसले, संभाजी ब्रिगेड नांदेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील, संभाजी ब्रिगेड उत्तर जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे,मध्य जिल्हाध्यक्ष भगवान कदम,जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर पाटील,कमलेश कदम,वीर भगतसिंग विद्यार्थी परीषद जिल्हाध्यक्ष इंजि.प्रविण जाधव महानगराध्यक्ष निशिकांत धोंडगे यांच्यासह बहुसंख्य शिवप्रेमींची उपस्थिती होती.
बैठकीचे सुत्रसंचालन रमेश पवार यांनी केले तर आभार परमेश्वर पाटील यांनी मानले.
सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती-२०२१ चे अध्यक्ष व स्वागताध्यक्ष यांचे अनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा