पिंपळनेर केंद्रातील सर्व शाळांना 50 हजार रुचे आँक्शीमिटर व र्थमलगणचे समर्थ उदयोग समुहाकडून मोफत वाटप
निमगाव (.टे ) प्रतिनिधी पिंपळनेर केंद्रातील शालेय विदयाथी व शिक्षक कोरोनापासुन सुरक्षित रहावेत यासाठी सापटणे येथील उदयोजक व पुणे येथील समर्थ उद्योग समुहाचे संस्थापक विठ्ठलराव (भाऊ) ढवळे यांनी शाळाना 50 हजार रुपये किमतीच्या साहित्याचे वाटप जि.प.सदस्य बंडुनाना ढवळे व विठ्ठल ढवळे यांचे हस्ते करण्यात आले.
सापटणे (टे) गावातील व पिंपळनेर केंद्रातील सर्व शाळामधील सर्व समस्या व विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी आपन सदैव शिक्षकांचे पाठीशी राहु अशे ही त्यांनी यावेळी सांगितले
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवता पुर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी सदैव कार्यरत रहावे असे जि.प.सदस्य प्रतिनिधी ब़डूनाना ढवळे यांनी सागितले सापटणे टे गाव शैक्षणिक बाबतीत आग्रेसर बनवणार असुन त्या साठी शिक्षकांनी तयार रहावे असेहि त्यांनी सांगीतले सापटणे शाळा व हायस्कूल संपूर्ण डिजिटल शिक्षणाची सोय विद्यार्थ्यांना करून देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले
प्रास्ताविकात केंद्राचे प्रगतीचा आढावा केंद्रप्रमुख भाऊराव शिंदे यांनी सांगुण केंद्रातील सर्व शाळामधील सर्व वर्ग डिजिटल करण्यासाठी समर्थ उद्योग समुहाने मदत करावी असे अवाहन केले
सुत्रसंचालन तांबवे शाळेचे मुख्याध्यापक तानाजी ढवळे यांनी तर आभार गंगामाईनगर शाळेचे मुख्याध्यापक द.रा. शिंदे यांनी केले.
यावेळी उपस्थित सर्व शिक्षकांना
समर्थ ग्रुपच्या विविध उपक्रमांची व उत्पादनाची माहिती हि देण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा