*कोरोना लसीकरणासाठी बीड जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी*
*गेवराई प्रतिनिधी- नवनाथ आडे*
गेवराई ( प्रतिनिधी ):- बीड जिल्ह्यात कोरोना टेस्ट वाढवण्यात आल्या. मास्कबाबत सक्ती करण्यात आली. त्याचबरोबर कोरोना लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली.
संबंधीत खात्याच्या अधिकार्यांनी आपल्या कर्मचार्यांना तात्काळ लस देण्याच्या सूचना दिल्यानंतर आज लस घेण्यासाठी बीड जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे दिसून आले.
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागल्याने पुन्हा कोरोनाच्या लसीकडे लाभार्थ्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे.
कोरोनावरची लस उपलब्ध झाल्यानंतर आरोग्य विभागासह अन्य खात्यातील कर्मचार्यांना सर्वप्रथम लस देण्याचे आयोजन करण्यात आले.
गेल्या आठ दिवसांपूर्वी आयूक्त सुनिल केंद्रेकरांनी मराठवाड्यातील जिल्हाधिकारी, एसपी, मुख्याधिकारी यांची बैठक घेवून कोरोनाबाबत सतर्क राहण्याच्या सूचना केल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा